sheera
sheera sakal
फूड

पावसाळ्यात चवदार खावसं वाटतं? ट्राय करा कणकेचा शिरा

सकाळ डिजिटल टीम

पावसाळा सुरू झाला की वातावरणात थंडावा येतो अन मग अशावेळी चवदार काहीतरी खावं वाटतं. तेव्हा तुम्ही कणकेचा गरमागरम शिरा करुन खाऊ शकता. हा कणकेचा शिरा कसा करायचा तेच आज आपण पाहणार आहोत. (recipe of tasty kanakes shira)

कणकेचा शिरा करण्यासाठी लागणारे साहित्य:

  • 1 वाटी कणीक(गव्हाचे पिठ)

  • अर्धी वाटी साजुक तूप

  • पाऊण वाटी गूळ

  • 2 वाट्या कोमट पाणी

  • आवडीनुसार बदामाचे तुकडे

  • काजुचे तुकडे, बेदाणे आणि चारोळी

कृती:

  • सर्वप्रथम एका स्टीलच्या कढईत कणीक घालून, ती गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यावी.

  • कणीक गुलाबी झाली की मग त्यात तूप घालून अजून छान भाजावं. कणकेचा खमंग वास आला पाहिजे आणि रंग गुलाबी-लाल झाला पाहिजे. पण कणीक भाजताना काळजीपूर्वकरित्या भाजा, कारण कणीक लवकर जळते.

  • आता त्यात पाणी कोमट करून घाला आणि नीट हलवून घ्या. त्यात गुठळ्या होता कामा नये. कढईवर झाकण ठेवा आणि दणदणीत वाफ येऊ द्या.

  • चांगली वाफ आल्यानंतर त्यात गूळ घाला तसंच सुकामेवा घाला. नीट हलवून घ्या आणि झाकण घाला.

  • अगदी मंद आचेवर मधूनमधून हलवत 4-5 मिनिटं वाफ येऊ द्या. शिरा तयार आहे.

    टिप- शिरा करतांना कणीक मात्र चांगली भाजली गेली पाहिजे. कारण ती नीट भाजली नाही तर शि-याचा लगदा होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT