चीज व्हेज फिंगर्स 
फूड

चीज व्हेज फिंगर्स बनवा, ही आहे रेसिपी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - चहाबरोबर बिस्किट आणि नमकीन खाण्याऐवजी चीज व्हेज फिंगर्स खा. घरांतील सर्वांना ते खायला आवडेल.

साहित्य

- बटाटा - ६०० ग्रॅम

- चेडार चीज - १०० ग्रॅम (बारीक किसलेला)

- माॅजरेला चीज - १०० ग्रॅम

- ब्रेड क्रम्बस - १/२ कप

- मैदा - २ टेबल स्पून

- चिली फ्लेक्स - आवश्यकतेनुसार

- हिरवी मिरची - २ बारीक कापलेली

- ऑरिगेनो - १ टी स्पून

- तुलशीची सुकलेले पाने - १ टी स्पून

- मका - ३/४ कप उकडून पाण्याबाहेर काढलेले.

- हिरवी मटर - १/२ कप

- कोबी बारीक कापलेली - ३/४ कप

- गाजर - १/२ कप (बारीक कापलेले)

- शिमला मिरची - १/४ कप बारीक कापलेले

- लसूण - १/२ टेबलस्पून बारीक कापलेले

- चीज - २ टेबल स्पून

- मीठ चवीनुसार

- तेल - तळण्यासाठी

कृती

- एका पॅनमध्ये तूप गरम करुन घ्या. त्यात लसूण हलक्या आंचवर तळून घ्या

- आता त्यात हिरवी मटर, कोबी आणि गाजर मिक्स करा. मोठ्या आंचवर २-३ मिनिटांपर्यंत शिजवा

- कोबीतून पूर्ण पाणी जाईपर्यंत शिजवा

- नंतर शिमला मिरची टाकून थोडे वेळ आणखीन शिजवा

- आता एका वाटीत शिजवलेली भाज्या, मक्याची पेस्ट आणि सर्व घटक एकत्र करुन घ्या

- थोडेसे मिक्स्चर घेऊन हातावर तेल लावून निमुळत्या किंवा गोलाकार बनवा.

- कढईत तेल गरम करा. त्यात गोलाकार फिंगर्स टाकून चांगल्या प्रकारे तळून घ्या.

- मेयोनीज किंवा टोमॅटो साॅसबरोबर खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: राज्याचा नेता असूनही धनंजय मुंडेंचा बॅनरवर फोटो का नाही? बाबरी मुंडेंनी स्पष्ट सांगितलं

Latest Marathi News Updates Live : चिखलीत अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी

PUBG Game Incident: पुण्यात 'PUBG' खेळताना घडला थरार!, मित्रांना पिस्तूल दाखवण्याचा नादात खरंच सुटली गोळी अन्..

शी... काही पण! सैयारा फेम अहान पांडेने खाल्ले विंचू? व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'एवढा घाणेरडा...'

Genital Feature Mapping: प्रज्वल रेवण्णा प्रकरणात आरोपीच्या शिक्षेसाठी 'जेनिटल फीचर मॅपिंग'चा वापर, ते नेमके काय आहे? कसे काम करते?

SCROLL FOR NEXT