Cheez Chilly Uttapa esakal
फूड

Cheez Chilly Uttapa : नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी अन् टेस्टी चीझ-चिली उत्तपा

आज अशीच एक टेस्टी, हेल्दी आणि झटपट बनणारी रेसिपी घेऊन आलो आहोत. मुलांच्या डब्यासाठीही हा पदार्थ उत्तम ठरतो. जाणून घेऊ कसा बनवावा चीझ चिली उत्तपा.

सकाळ डिजिटल टीम

Breakfast Tips Cheez Chilly Uttapa : रोज नाश्त्याला नवीन काय बनवायचं हा कोणत्याही गृहिणी पुढचा खूप मोठा प्रश्न असतो. त्याचच उत्तर आम्ही घेऊन येतो. आज अशीच एक टेस्टी, हेल्दी आणि झटपट बनणारी रेसिपी घेऊन आलो आहोत. मुलांच्या डब्यासाठीही हा पदार्थ उत्तम ठरतो. जाणून घेऊ कसा बनवावा चीझ चिली उत्तपा.

साहित्य

रवा -१ वाटी, पाणी, दही अर्धी वाटी, चिरलेल्या मिरच्या २, बारीक चिरलेला कांदा - १, चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो - १, चिली फ्लेक्स / लाल तिखट, खिसलेलं चीज, मीठ.

कृती

एका बाऊलमध्ये रवा, दही आणि थोडेसे पाणी घालून नीट मिक्स करून घ्या. नंतर १५ मिनीटं झाकून ठेवा. मग डोसा पॅन गॅसवर चांगला तापू द्या. त्यावर थोडं तेल घाला.

तयार केलेल्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून बॅटर डोस्यासाठी योग्य असं पातळ करा. त्यात चिमूटभर सोडा / इनो घाला. त्यावर गरम पाणी घालून थोडं लाल तिथट किंवा चिली फ्लेक्स घाला. सर्व नीट मिक्स करा.

मग बॅटर डोसा पॅन वर लहान लहान आकाराच्या उत्तप्याच्या आकारात घाला. त्यावर चिरलेल्या मिरच्या, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घाला. दोन्ही बाजूने नीट शेका.

मग उत्तपा सरळ करून त्यावर खिसलेले चीझ घाला. झाकण ठेऊन १ मिनीट शेका. मग उत्तपा प्लेटमध्ये काढा.

तुमचा चीझ चिली उत्तपा तयार आहे. याला टोमॅटो सॉस, खोबऱ्याची, दाण्याची चटणी, हिरवी चटणी कशाही सोबत खाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT