Cooking Tips esakal
फूड

Cooking Tips : भाजीच्या ग्रेव्हीत दही घालताना लक्षात ठेवा या गोष्टी, शेफ पंकज भदोरियाने सांगितल्या खास टिप्स

ग्रेव्हीमध्ये दही घातल्यानंतर त्याची चव खराब होते अशी बऱ्याच गृहिणींची तक्रार असते

साक्षी राऊत

Cooking Tips : गृहिणी घरातील स्वयंपाक बनवण्यासाठी बऱ्याचदा खास शेफच्या कुकींग टिप्स फॉलो करतात. भाजीची ग्रेव्ही टेस्टी असेल तर घरात अगदी आवडीने खाल्ली जाते. मात्र तुमच्या कुकींगमधील काही चुका कधीकधी तुमच्या भाजीची टेस्ट बिघडवता. जसे की, ग्रेव्हीमध्ये दही घातल्यानंतर त्याची चव खराब होते अशी बऱ्याच गृहिणींची तक्रार असते. असे होऊ नये यासाठी शेफ पंकज भदोरिया काही खास टिप्स सांगतात. जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.

मास्टर शेफ पंकज भदोरियाने अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून काही टिप्स सांगितल्या आहेत. ग्रेव्हीमध्ये दही घातल्यावर ग्रेव्ही खराब होऊ नये यासाठी तीन सोप्या टिप्स दिल्या आहेत.

ग्रेव्हीमध्ये दही कसे घालायचे ते एक्सपर्टकडून जाणून घेऊया

१) कुठल्याही ग्रेव्हीमध्ये दही घालण्याआधी ते चांगल्याप्रकारे फेटून घ्या. यासाठी तुम्ही ग्राइंडरचा वापरही करू शकता.

दही तेव्हापर्यंतच ढवळा जेव्हापर्यंत ते हलकं पातळ होत नाही. अति पातळ करू नका.

२) जेव्हा तुम्ही दही ग्रेव्हीमध्ये टाकाल तेव्हा त्याला मंद आचेवर ठेवा. यामुळे दहीला ग्रेव्हीमध्ये सेट होण्यासाठी पूरेपूर तापमान मिळेल. आणि तुमची ग्रेव्हीसुद्धा खराब होणार नाही. (Recipes)

३) एकदा दही ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर तेव्हापर्यंत चमच्याने परता जेव्हापर्यंत दही पूर्णपणे उकळत नाही. यामुळे दही गुठळ्यांच्या रूपात दिसणार ग्रेव्हीमध्ये दिसणार नाही. (Food)

ही पद्धत ठरेल फायदेशीर

ग्रेव्हीमध्ये दही घालताना त्यात थोडं कॉर्नस्टार्च मिसळल्यास ग्रेव्ही खराब होत नाही. याचा वापर तुम्ही ग्रेव्ही घट्ट करण्यसाठीही करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT