Adhik Maas 2023  Esakal
फूड

Adhik Maas 2023: छत्रपती संभाजीनगर मध्ये गाजतीय चक्क 'धोंडा स्पेशल थाळी', काय आहे स्पेशल ?

तुम्हाला जर का तुमच्या लाडक्या लेकी जावाया धोंडा स्पेशल खास जेवु घालायचे असेल तर छत्रपती संभाजीनगर मध्ये पूर्णब्रह्ममध्ये तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता.

दिपाली सुसर

Adhik Maas 2023 : महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो. इ. सन पूर्व 4 ते 5 हजार वर्षांपूर्वींपासून आपल्या कालगणनेत अधिकमास धरण्याची पद्धत आहे. वेदकालीही कालगणनेत चांद्र- सौर पद्धतीचा मेळ घातलेला होता. त्याकाळीही अधिक महिने धरले जात होते. महाभारतातही अधिकमासांचे उल्लेख आहेत.

धोंड्याच्या महिन्यात म्हणजे अधिक महिन्यात जावयाला खूप महत्त्व असतो.यंदा श्रावण महिना 18 जुलैपासून सुरु होऊन 15 सप्टेंबरपर्यंत राहील तसेच पुरुषोत्तम मास 18 जुलैपासून सुरू होईल. अधिककामाच्या दिवसांची भर पडल्यामुळे यावेळी श्रावण महिना 59 दिवसांचा असेल ज्यामध्ये 8 सोमवार असतील. हिंदू कॅलेंडरमध्ये दर तीन वर्षांनी एकदा, एक अतिरिक्त महिना येतो, ज्याला अधिक मास, मल मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. हिंदू धर्मात या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. 

मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्याल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा, मध्येच आलेल्या दगडासारखा (धोंड्यासारखा) आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एक  आख्यायिका आहे. मात्र, धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला 'धोंडा' म्हटले जाते. 

महाराष्ट्रात इतर ठिकाणी नागपंचमीला पुरण घालून जो चौकोनी पदार्थ केला जातो, त्याला दिंड म्हणतात, तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो त्यालाच धोंड्याचा नैवेद्य म्हणातात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रुपाने नारायणाने धोंड्यांचा नैवेद्य स्वीकार केला, असे समजतात. 

आपल्याकडे मुलगी आणि जावायाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानल्या जाते. अधिक मासात जावायाला पुरणाचे धोंडे करून दीप दान देण्याचेही महत्त्व आहे. हे पुण्यप्रत मानल्या जाते. अधिक महिना हा 33 दिवसांचा असतो. त्यामुळे या महिन्यात 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या महिन्यात जावायाला वाण देतांना 33 अनारसे आणि पुरणाचे धोंडे देण्याची पद्धत आहे. या सोबतच अनेक जण चांदीचा दिवा आणि सोन्याची भेटवस्तू देतात. 

तुम्हाला जर का तुमच्या लाडक्या लेकी जावाया धोंडा स्पेशल खास जेवु घालायचे असेल तर छत्रपती संभाजीनगर मध्ये पूर्णब्रह्ममध्ये तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. कारण पूर्णब्रह्ममध्ये धोंडा स्पेशल खास थाळी सुरू करण्यात आली आहे.

धोंडा स्पेशल खास थाळी का ठरते आकर्षणाचा बिंदु?

पूर्णब्रह्ममध्ये जेवायला महाराष्ट्रीयन पद्धतीनं भारतीय बैठक, चौरंगावर सुशोभित केलेलं भरगच्च धोंडयाची जेवणाची थाळी असते. त्यात खास धोंडे,अनारसा, पुरणपोळी, कटाची आमटी, कढी,भात, बटाटा वडा, साबुदाणा वडा,मिर्ची भजे, पापड, दुध,साधी पोळी,आणि भाजी,वरणभात इ.मेनु असणार आहे.

पूर्णब्रम्ह एक खास वैशिष्ट्य म्हणजे यांच्या किचनमध्ये रोज सात्विक जेवण तयार होतंचं सोबतच त्याच्यां वेगवेगळ्या दिवसाच्या वेगवेगळ्या थाळी खूप झकास असते.

साबुदाणा वडा,उकडीचे मोदक,पुरणपोळी,श्रीखंड, पियुष, कचोरी, भजी अशी असंख्य महाराष्ट्रीयन पदार्थ तुम्हाला पूर्णब्रम्हला वर्षभर खायला मिळतात. थोडक्यात काय तर संभाजीनगरच्या पूर्णब्रम्हच्या शाखेत तुम्हाला अगदी आपल्या आजी, आई यांच्या काळातील संपूर्ण मराठी पदार्थ खायला मिळतील.पूर्णब्रह्म मध्ये एक गोष्ट कटाक्षाने पाळली जाते. ते बिलकुल अन्नाची नासाडी होऊ देत नाहीत. त्यासाठी जो ग्राहक सगळं पान स्वच्छ करेल त्याला बिलामध्ये 5% सवलत दिली जाते.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठे आहे पूर्णब्रह्मची शाखा?

कोटेजा बिझनेस हब हाय कोर्ट जवळ प्लॉट न. 5 पहिला मजला, जालना रोड N - 3 सिडको, छत्रपती संभाजीनगरछत्रपती संभाजीनगरची पूर्णब्रह्मची शाखा ही लोकांच्या पोटासोबत त्याच्या मनाची देखील काळजी घेत तेथील पदार्थांचा दर्जा, सर्व्हीस, अस्सल महाराष्ट्रीयन चव आणि तुम्हाला तिथे भेटणारी शांतता ही मन तृप्त करून टाकणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT