Chicken Fry Recipe Esakal
फूड

Chicken Fry Recipe: रविवार स्पेशल चिकन फ्राय कसे तयार करायचे?

चिकन फ्राय हे तयार करायला खूप सोपी आणि खूप कमी वेळात, मोजक्या साहित्यामध्ये अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर बनणारी रेसिपी आहे.

सकाळ डिजिटल टीम

चिकन फ्राय हे तयार करायला खूप सोपी आणि खूप कमी वेळात, मोजक्या साहित्यामध्ये अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर बनणारी रेसिपी आहे. ज्या लोकांना मांसाहारी पदार्थ आवडतात जसे कि चिकन मसाला, चिकन लॉलीपॉप, चिकन बिर्याणी इत्यादी आणि त्यामधील एक सोपा, स्वादिष्ट आणि लगेच बनणारा नॉनव्हेज पदार्थ म्हणजे चिकन फ्राय आणि आज आपण या लेखामध्ये रविवार स्पेशल चिकन फ्राय कसे तयार करायचे याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

1) बोनलेस चिकन 500 ग्राम

2) लिंबूचा रस एक चमचा

3) आलं-लसणाची पेस्ट एक चमचा

4) लाल मिरची पावडर दोन चमचे

5) मिरची पावडर एक चमचा

6) जिरा पावडर अर्धा चमचा

7) कॉर्नफ्लोर एक चमचा

8) तांदळाचा पीठ एक चमचा

9) अंडा एक

10) कढीपत्ता सात आठ

11) हिरवी मिरची 3

12) तेल डीप फ्राय करण्यासाठी

13) मीठ स्वादानुसार

कृती:

सगळ्यात पहिल्यांदा चिकन पिस ला चांगले पाण्याने धुऊन घेणे. धून झाल्यानंतर चिकन चं पाणी सुकण्यासाठी ठेवणे. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची फ्राय करून घ्या. त्यानंतर एका भांड्या मध्ये चिकन पीस घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून चांगले मॅरीनेट करून घेणे आणि दहा मिनिटासाठी एका बाजूला ठेवून देणे .आता एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोर , तांदळाचा पिठ , अंडा , आलं-लसणाची पेस्ट , लाल मिरची पावडर घालून मिक्स करून घ्या. आता यामध्ये चिकन सिक्सटी फाय मसाला, जीरा पावडर, हळद पावडर आणि मीठ लावून चिकनला एका तासासाठी पुन्हा एकदा मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवून द्या.त्यानंतर गॅस वर कढाई ठेवून त्यामध्ये तेल ओतून घ्यावे. तेल चांगले गरम झाल्यानंतर मॅरीनेट केलेले चिकन पीस थोडे थोडे करून चांगले फ्राय करून घ्या.बारीक गॅसवर फ्राय करून घ्या म्हणजे ते क्रिस्पी होतात.जेव्हा चिकन गोल्डन ब्राऊन होतो तेव्हा गॅस बंद करून चिकन ला प्लेट मध्ये काढून घ्या. नंतर चिकन ला फ्राय केलेला कढीपत्ता आणि हिरवी मिरची करून सर्व करा. आपण हे चिकन फ्राय रोटी, नान, चपाती किंवा ब्रेडसोबत साइड डिश म्हणून खाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT