Chickpeas Recipe Esakal
फूड

Chickpeas Recipe: हिवाळा स्पेशल काळ्या चण्याची पौष्टिक उसळ कशी तयार करायची?

कारण चण्यांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे असतात, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात.

सकाळ डिजिटल टीम

हरभरे म्हणजेचं चणे (Chickpeas) हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. भारतीय प्रत्येक स्वयंपाकघरात कडधान्यात काळे चणे सहज आढळतात. काळे चणे खाण्याचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. काळ्या चण्यांचे सेवन केल्याने अनेक प्रकारचे आजार तुमच्यापासून दूर राहू शकतात. कारण चण्यांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे असतात, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. चणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. आजच्या लेखात आपण हिवाळा स्पेशल काळ्या चण्याची पौष्टिक उसळ कशी तयार करायची? याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:

● एक कप काळे चणे

● तिन चमचे ओलं खवलेलं नारळ

● कढीपत्ता 

● मोहोरी

● जीरे

● हिंग

● हळद

● लाल तिखट

● गोडा मसाला

● चिंचेचा कोळ

● किसलेला गूळ

● तेल

● कोथिंबीर

● चवीपुरते मीठ

कृती:

चणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी भिजलेले चणे निवडून घ्यावे. जर त्यात कडक राहिलेले चणे असतील तर ते काढून टाकावे. नंतर एका छोट्या कूकरमध्ये तेल गरम करावे. त्यात तेल मोहोरी, जीरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात ओलं खवलेलं खोबरं घालावं. खोबरं परतलं कि त्यात भिजवलेले चणे घालावे व  5 मिनीटे मध्यम आचेवर परतून घ्यावे. कूकरमध्ये त्यात दिड पेला पाणी घालावे. त्यात गोडा मसाला, चिंचेचा कोळ, किसलेला गूळ आणि मीठ घालावे. कूकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या कराव्यात. वाफ मुरल्यावरच कूकर उघडावा. चिरलेली कोथिंबीर घालावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT