chole recipe of restaurant style  
फूड

Chole Recipe : घरीच रेस्टॉरंट स्टाइलमध्ये मसालेदार छोले कसे बनवावे, पाहा रेसिपी

आज तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईलमध्ये छोले कसे बनवावे ही सोपी रेसिपी सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

आज तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईलमध्ये छोले कसे बनवावे ही सोपी रेसिपी सांगणार आहोत.

चटपटीत आणि मसालेदार चणे म्हणजेच अनेकांचे आवडचे छोलेसोबत गरमा गरम भटुरे ही अनेकांची आवडती डिश आहे. हे पदार्थ खाल्ल्याने अनेकांचा दिवस खास होतो. यातच आणखी एक विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी छोले भटुरे खाण्याची मजा काही औरच असते. तुम्ही अनेकवेळा रेस्टॉरंटमध्ये छोले भटुरे खाल्ले असतील पण घरी छोले बनवता तेव्हा त्याची चव रेस्टॉरंटच्या स्टाईलसारखी नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईलमध्ये छोले कसे बनवावे ही सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता. घरच्या घरी चला, रेस्टॉरंट स्टाईल छोले-भटुरे कसे बनवायचे ते जाणून घेवूया.. (chole recipe of restaurant style)

रेस्टॉरंट स्टाईलमध्ये छोले बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

  • 2 कप चणे

  • 4 हिरव्या मिरच्या

  • 1 टीस्पून लाल तिखट

  • 2 मूठभर हिरवे धने

  • 1 टीस्पून लसूण पेस्ट

  • आवश्यकतेनुसार पाणी

  • 1/2 कप कांदा

  • 3 चमचे लिंबाचा रस

  • आवश्यकतेनुसार मीठ

  • 1 टेबलस्पून एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल

  • 1 टीस्पून आले पेस्ट

  • 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर

रेस्टॉरंट स्टाईलमध्ये छोले बनवण्याची रेसिपी :

झटपट रेस्टॉरंट स्टाईलमध्ये हे रेसिपी बनवायची असल्यास सुरुवातीला चणे म्हणजेच छोले किंवा (हरभरे) रात्रभर धुवून भिजत ठेवा. यानंतर भिजलेले हरभरे धुवून त्याला कुकरमध्ये टाकून २-३ शिट्ट्या करुन घ्या. यानंतर, एक पॅन घ्या आणि त्यात तेल पुरेसे गरम करुन घ्या. यानंतर त्यात चिरलेली हिरवी मिरची, कांदा, आले आणि लसूण पेस्ट घालून परतून घ्या. कांदा सोनेरी झाल्यावर त्यात हरभरा सोबत छोलेसाठीचे मसाले टाका. मसाला आणि चणे चमच्याने हलवा, शेवटी लिंबाच्या रसामध्ये मीठ आणि मिरपूड घाला. कोथिंबीर घालून नीट परतून घ्या. गॅस बंद करून गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT