Christmas Special Cake Esakal
फूड

Christmas Special Cake: ख्रिसमच्या दिवशी घरच्या घरी झटपट कसा तयार करायचा ओरिओ केक?

ख्रिसमसच्या निमित्ताने लोक अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करतात.

सकाळ डिजिटल टीम

Oreo Cake Recipe: वर्षाचा शेवटचा महिना चालू आहे. लवकरच ख्रिसमस साजरा केला जाईल. ख्रिसमसच्या निमित्ताने लोक अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करतात. केक कापून ख्रिसमसचं सेलिब्रेशन केलं जातं. ओरिओ केक घरातील लहान मुलांना खूप आवडतो,म्हणूनच घेऊन आलो आहे ख्रिसमस स्पेशल ओरिओ केकची सोपी रेसिपी…

साहित्य

दोन पुडे ओरियो बिस्कीट (12 नग)

एक चमचा पिठीसाखर

अर्धा चमचा बेकिंग पावडर

एक वाटी दूध

ड्रायफ्रुट्स

कृती:

ओरियो बिस्कीटला मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या. आता त्यात दूध, साखर, बेकिंग पावडर घाला. एकजीव मिश्रण तयार करा. आता एक मोल्ड घ्या. त्याला छान बटर किंवा तेलाने ग्रीस करा. या मोल्डमध्ये त्यात हे मिश्रण टाका. 4 ते 5 मिनिटे मायक्रोवेव्ह करा. केक पूर्ण शिजेपर्यंत वाट बघा. गरज असल्यास बेकिंगची वेळ वाढवा. टूथपिक टाकून केक शिजला कि नाही हे चेक करा. मग मोल्ड काळजीपूर्वक बाहेर काढा. एका ट्रेमध्ये ठेवा. त्यावर चॉकलेट गानाश , व्हीप्ड क्रीम आणि ड्रायफ्रुट्स घालून सजवा.ज्या लोकांना चॉकलेट खायला आवडते. त्यांना हा केक खूप आवडेल. याशिवाय हा केक तुम्ही काही मिनिटांत तयार करू शकता. तुम्ही यावर ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे केक थोडा हेल्दी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plastic Note: भारतात प्लास्टिकच्या नोटा कधी सुरू होणार? RBI गव्हर्नरांनी 'ती' वेळच सांगितली; महत्त्वाची माहिती समोर

Numerology: न सांगताही ओळखतात मनातील भावना! लहानपणापासूनच 'सीक्रेट कीपर' असतात 'या' मूलांकाचे लोक...

सर डॉन ब्रॅडमन यांनी ३ षटकांत झळकावले होते शतक... २५६ धावांच्या खेळीत १४ षटकार, २९ चौकारांची आतषबाजी...

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाकडून टेवोल्डे गेब्रेमारियम यांची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

SCROLL FOR NEXT