Christmas 2023 esakal
फूड

Christmas 2023 : यंदा ख्रिसमसला ज्वारीच्या पीठापासून बनवा हेल्दी आणि टेस्टी केक, एकदम सोपी आहे रेसिपी

हा हेल्दी आणि टेस्टी केक ज्वारीच्या पीठापासून बनवला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Christmas 2023 : डिसेंबर महिना सुरू झाला की, सगळ्यांना वेध लागतात ते ख्रिसमसचे. आता अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येउन ठेपला आहे. त्यामुळे, मार्केटमध्ये सर्वत्र ख्रिसमसच्या सजावटीच्या गोष्टी, केक्स, कपकेक्स, पेस्ट्री इत्यादी अनेक गोष्टींची लगबग पहायला मिळत आहे.

परंतु, ख्रिसमसला अनेकदा मैदा, साखर आणि चॉकलेट सिरपचा वापर करून पारंपारिक पद्धतीने केक्स बनवले जातात. मात्र, या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी अनहेल्दी आहेत.

आज आम्ही तुम्हाला हेल्दी आणि टेस्टी केकची रेसिपी सांगणार आहोत. हा केक ज्वारीच्या पीठापासून बनवला जातो. चला तर मग जाणून घेऊयात ज्वारीच्या पीठापासून बनवल्या जाणाऱ्या या केकची रेसिपी.

ज्वारीच्या पीठाचा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • ३ वाट्या ज्वारीचे पीठ

  • २ चमचे कोको पावडर

  • ५०० ग्रॅम दही

  • १ कप दूध

  • २ चमचे लोणी

  • पीठीसाखर १ कप

  • व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा

  • मिक्स ड्रायफ्रूट्स (मूठभर)

  • चॉकलेट सिरप

(Ingredients required to make jowar cake)

ज्वारीच्या पिठापासून केक बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या बाऊलमध्ये ज्वारीचे पीठ आणि कोको पावडर चाळणीच्या मदतीने चाळून घेऊन एकत्र करा.

  • आता एका बाऊलमधये दही, पीठीसाखर आणि लोणी चांगले मिक्स करून घ्या आणि त्यात व्हॅनिला इसेन्स घाला.

  • आता हे मिश्रण ज्वारीचे पीठ आणि कोको पावडरच्या मिश्रणात घाला. हे मिश्रण जोपर्यंत चांगले घट्ट होत नाही, तोपर्यंत चांगले मिक्स करा.

  • या पीठात गुठळ्या झाल्या तर यात तुम्ही थोडे बटर घालू शकता.

(The correct method of making cakes from jowar flour)

  • ज्वारीच्या केकचे हे मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर केकचे भांडे घ्या.

  • आता या केकच्य भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्या आणि मग त्यात केकचे मिश्रण पसरवा.

  • आता मायक्रोवेव्हमध्ये १५० डिग्री सेल्सिअसवर हा केक ३०-४० मिनिटांसाठी बेक करायला ठेवा.

  • केक पूर्ण बेक झाल्यानंतर थंड करायला ठेवा.

  • त्यानंतर, केक प्लेटमध्ये काढून ठेवा. त्यावर चॉकलेट सिरप लावा आणि तुमच्या आवडीनुसार मिक्स ड्रायफ्रूट्स आणि टॉपिंग्सने केक सजवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT