Coconut Paneer Recipe esakal
फूड

Coconut Paneer Recipe : घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ही झटपट बनणारी खास डिश, पाहुणेही म्हणतील वाह..

आज आम्ही तुम्हाला झटपट बनणारी स्पेशल डिश रेसिपी सांगणार आहोत. तेव्हा लगेच ही रेसिपी नोट करून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम

Coconut Paneer Recipe : घरी अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी वेळेवर काय खास पाहुणचार बनवता येईल याने गृहिणींना टेंशन आलं असतं. बऱ्याच दिवसांनी आलेल्या पाहुण्यांना काही तरी स्पेशल डिश खाऊ घालणे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्यच आहे. मात्र झटपट पण स्वादिष्ट काय बनवता येईल याचा विचार करत बसत टेंशन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला झटपट बनणारी स्पेशल डिश रेसिपी सांगणार आहोत. तेव्हा लगेच ही रेसिपी नोट करून घ्या.

घरी काहीतरी वेगळे करून पाहण्यासाठी, तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी कोकोनट पनीर बनवू शकता. कोकोनट पनीरची रेसिपी सोपी आहे आणि खूप चवदार आहे. चला तर मग जाणून घेऊया नारळाचे पनीर बनवण्याची रेसिपी.

कोकोनट पनीरसाठी लागणारे साहित्य

२५० ग्रॅम पनीर

१/२ कप फ्रेश क्रीम

१/२ टीस्पून गरम मसाला

१/२ टीस्पून हळद

५ चमचे किसलेले खोबरे

२-३ बारीक चिरलेले टोमॅटो

२ बारीक चिरलेले कांदे

१ टीस्पून आले लसूण पेस्ट

१ चमचे लाल तिखट

१ चमचा पनीर मसाला

३-४ हिरव्या मिरच्या

२ तमालपत्र

२-३ लवंगा

२-३ वेलची

थोडे तेल

चवीनुसार मीठ

कोकोनट पनीर पनवण्याची सोपी पद्धत

ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी पनीरचे चौकोनी तुकडे करा. आता कढईत तेल टाकून गॅसवर ठेवा. तेल गरम झाल्यावर पनीरचे तुकडे हलके तळून घ्या. आता पनीर काढा आणि बाजूला ठेवा. यानंतर जिरे आणि तमालपत्र घालून गरम तेलात तळून घ्या. नंतर त्यात लवंग, वेलची आणि आले लसूण पेस्ट मिक्स करा. आता १ मिनिट परतून झाल्यावर कांदा घाला. कांदे हलके सोनेरी दिसायला लागले की टोमॅटो घालून परतून घ्या.

टोमॅटो मऊ झाल्यावर त्यात हळद, गरम मसाला आणि पनीर मसाला घालून तळून घ्या. आता त्यात किसलेले खोबरे आणि लाल तिखट मिसळा. सुमारे २-३ मिनिटे शिजवल्यानंतर, या मिश्रणात मलाई घाला. थोडा वेळ ढवळल्यावर तळलेले पनीर, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. आता ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत शिजवा. तुमचे कोकोनट पनीर तयार आहे, किसलेल्या नारळाने सजवून सर्व्ह करा. (Coconut)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT