Corn Poha Recipe sakal
फूड

Corn Poha Recipe: नाश्त्याला नेहमी एकाच चवीचे कांदेपोहे खाऊन कंटाळलात? मग कॉर्न पोहे नक्की ट्राय करा

पोहे पचायला अतिशय हलके आणि स्वादिष्ट असतात.

Aishwarya Musale

लोकांना नाश्ता म्हणून पोहे खूप आवडतात. अनेक ठिकाणी पोहे स्ट्रीट फूड म्हणूनही प्रसिद्ध आहेत. पोहेही घरीच तयार करून खाल्ले जातात. जर तुम्हालाही पोहे खायला आवडत असतील आणि पोह्यांचे वेगळे प्रकार ट्राय करायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला कॉर्न पोहे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

कॉर्न पोहे बनवण्यासाठी पोह्यासोबत कॉर्नचा वापर केला जातो. ब्रेकफास्टशिवाय कॉर्न पोहे दिवसभरात केव्हाही बनवून खाऊ शकतात. मुलांनाही ही फूड डिश खूप आवडते. जर तुम्हाला ही रेसिपी घरी करून पहायची असेल, तर तुम्ही आम्ही दिलेल्या पद्धतीनुसार स्वादिष्ट कॉर्न पोहे तयार करू शकता.

लागणारे साहित्य

  • 100 ग्रॅम पोहे

  • 1 बारीक चिरलेला कांदा

  • 1/2 वाटी उकडलेले स्वीट कॉर्न

  • 2 पळी तेल

  • 1/2 चमचा हळद

  • 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • 1 चमचा साखर

  • 1/2 चमचा मोहरी

  • कडीपत्ता 1 काडी

  • लिंबू

  • चवी नुसार मीठ

  • कोंथिबीर

  • ओल्या नारळाचा किस

कृती

एका चाळणीत पोहे काढून स्वच्छ चाळून घ्या; त्यावर हळू हळू पाणी घालून ते ओले करून घ्या. पोहे जास्त ओले करू नका नाहीतर त्याचा लगदा होईल

कढई मध्ये 2 पळी तेल घाला; तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला, मोहरी छान तडतडली की त्यात हिंग आणि शेंगदाणे घाला; शेंगदाणे शिजायला वेळ लागतो त्यामुळे ते आधी टाकावे.

आता त्यात मिरची, कडीपत्ता, हलक्या फ्लेवर साठी थोडीशी कोथिंबीर आणि कांदा घाला; कांदा लालसर झाला की त्यात उकडलेले कॉर्न घाला.

सगळ छान परतवून त्यात हळद घाला आणि मग पोहे; सगळं व्यवस्थित परतवून घ्या. आता त्यात चवीपुरता साखर आणि मीठ घालुन छान मिक्स करा; आणि अगदी दोन मिनिटं वाफ भरण्यासाठी झाकण ठेवा.

वाफ भरली, पोहे शिजले की गॅस बंद करा सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून त्यावर ओल्या नारळाचा किस, कोथिंबीर घाला, बाजूला लिंबाची फोड ठेवा आणि सर्व्ह करा.

गरमागरम कॉर्न पोहे तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT