How to Make Rava Toast at Home: रविवार म्हणलं डाएटवर चिटी करणं आणि वेगवेगळे पदार्थ ट्राय करणं. पण रविवार हा आरामाचा देखील दिवस असल्यामुळे काहीतरी हलके-फुलके खाण्याचा दिवस असतो. रोजच्या नेहमीच्या नाश्त्याला थोडा ब्रेक देऊन काहीतरी चविष्ट, झटपट आणि हेल्दी खायचं असेल, तर रवा टोस्ट एकदम योग्य पर्याय ठरतो.
खास म्हणजे भरपूर भाज्यांनी युक्त हा टोस्ट आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रवा टोस्ट कुठल्याही वेळेस सहज बनवता येतो आणि सर्वांनाच आवडतो!
रवा - ½ कप
दही – ¼ कप
पाणी – ¼ कप
बारीक चिरलेली हिरवी मिरची – 1
कांदा, टोमॅटो, शिमला मिरची , गाजर – प्रत्येकी 2–3 टेबलस्पून
कोथिंबीर – बारीक चिरलेली
साखर – ½ टीस्पून
मीठ – चवीनुसार
ब्रेड स्लाइस (पांढरी किंवा ब्राउन) – 4
हिरवी चटणी – 4 टीस्पून
लोणी/बटर – 2 टीस्पून
एका भांड्यात रवा, दही आणि पाणी मिक्स करून गुळगुळीत पीठ तयार करा.
त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र मिक्स करा.
साखर आणि मीठ घालून हे मिश्रण 10–15 मिनिटं बाजूला ठेवा.
ब्रेड स्लाइसवर हिरवी चटणी लावून त्यावर रव्याचं मिश्रण पसरवा.
गरम तव्यावर टोस्ट रव्याच्या बाजूने शेकायला ठेवा. वरून लोणी लावावं.
रवा कुरकुरीत शेकला गेल्यावर टोस्ट पलटून दुसरी बाजूही खरपूस होईपर्यंत शेकावी.
गरमागरम टोस्ट टुकड्यांमध्ये कापून सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा. हा हेल्दी, टेस्टी आणि झटपट असा रवा टोस्ट नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.