Dal Vada Recipe Esakal
फूड

Dal Vada Recipe: साऊथ इंडियन पद्धतीने घराच्या घरी तयार करा खमंग दाळवडा...

डाळ वडा हा पदार्थ कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आवडीने खाल्ला जातो म्हणजेच हा पदार्थ कर्नाटकामध्ये लोकप्रिय आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पध्दतीचे पदार्थ बनवले जातात. तसेच डाळ वडा हा पदार्थ कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आवडीने खाल्ला जातो म्हणजेच हा पदार्थ कर्नाटकामध्ये लोकप्रिय आहे. जरी हा पदार्थ कर्नाटका तर प्रसिध्द आहेच परंतु हा पदार्थ भारताच्या काही इतर भागामध्ये देखील बनवला जातो. हा वडा चणा डाळ किंवा हरभरा डाळीपासून बनवला जातो आणि चणा डाळ हा एक पौष्टिक घटक आहे त्यामुळे हा पदार्थ लहान मुलांच्या पासून मोठ्यांच्या पर्यंत सर्वांच्यासाठी उत्तम रेसिपी आहे. चला तर मग आजच्या लेखात पाहू या साऊथ इंडियन पद्धतीने घराच्या घरी कसा तयार करायचा खमंग दाळवडा...

साहित्य

एक वाटी चना डाळ 

चिरलेला कांदा 

कढीपत्ता 

आले लसूण पेस्ट 

हळद 

लाल तिखट 

हिंग 

तीळ

कोथिंबीर

तेल 

मीठ

कृती:

खमंग डाळ वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुवा आणि 2 तास पाण्यात भिजत ठेवा.दोन तासानंतर डाळ एका गाळणीत टाकून पाणी काढून टाका आणि काही वेळ अशीच राहू द्या म्हणजे डाळीतील अतिरिक्त पाणी निघून जाईल.आता चणाडाळीचा चौथा भाग काढून एका भांड्यात अलगद ठेवा. यानंतर उरलेली चणाडाळ पाणी न घालता मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या.आता एका मोठ्या भांड्यात चणा डाळीची पेस्ट काढा. त्यात हळद, लाल तिखट आणि हिंग सोबत वेगळी ठेवलेली चणाडाळ घालून मिक्स करा.नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, आल्याची पेस्ट, चिरलेली कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले एकजीव करा.मिश्रण तयार झाल्यावर थोडे थोडे हातात घेऊन डाळ वडे तयार करा आणि एका प्लेटमध्ये वेगळे ठेवासर्व डाळ वडे बनवल्यानंतर कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात डाळ वडे तळून घ्यावे.स्नॅक्ससाठी तयार डाळ वडा हिरवी चटणी, दही किंवा टोमॅटो सॉस सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT