Dhaba style potato chur chur naan home made recipe food marathi news 
फूड

Dhaba Style Recipe : घरामध्ये सहजपणे बनवा ढाबा स्टाईल बटाटा चूर चूर नान

अर्चना बनगे

कोल्हापूर: रस्त्याच्या कडेला ढाब्यावर मिळणारे चूर चूर नान सगळ्यांनाच आवडतात. मसालेदार असे चूर चूर नान आपल्या जेवणामध्ये  असेल तर जेवणाचा स्वाद आणखीच वाढतो. असे नान आपल्याला घरामध्येच बनवायचे असेल तर सहजपणे हे कसे बनवता येईल याची माहिती आज तुम्हाला देत आहोत. बटाट्याचे अनेक  पदार्थ खात असतो जसे की बटाटा चिप्स, बटाटा वडा, फ्रेंच फ्राईज, स्प्रिंग पोटॅटो, बटाटा असे एक ना अनेक प्रकार आपण खातो. पण बटाटा चूर चूर नान हा अत्यंत साधा असा प्रकार आहे. जो सहजपणे घरी ही बनवता येतो. 

या पिठांचा करा वापर

बटाटा चूर चूर नान बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जोतो. पण  गव्हाच्या पिठापासून सुद्धा हे नान आपण बनवू शकतो. बटाटा चूर चूर नान आपण घरामध्ये असलेल्या उपलब्ध सर्व साहित्यामध्ये आरामशीर बनवू शकतो. हे नान कोणत्याही चटणी, लोणचे अथवा पनीरच्या भाजी बरोबर आपण खाऊ शकतो आणि यातून आपण ढाब्यावर जेवल्याचा आनंद मिळू शकतो.बटाटा चुर नान हे मैद्या पासून बनवले जाते. मात्र आपण यामध्ये काही प्रमाणात गव्हाचे पीठ घालून सुद्धा बनवू शकतो. किंवा जर आपल्याला शरीरासाठी पौष्टिक नान बनवायचे असेल तर फक्त गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा हे नान बनवू शकतो.

घरामध्ये  बनवा बटाटा चूर चूर नान  

1) एका भांड्यामध्ये दोन कप मैदा घ्या. त्यामध्ये चवीने थोडे मीठ टाका. साखर, बेकिंग पावडर आणि त्यामध्ये थोडे तूप घाला आणि ते मिश्रण करून घ्या
.
2) त्यामध्ये दही घाला आणि चांगल्या तऱ्हेने हे मिश्रण हलवून घ्या त्यामध्ये थोडे थोडे पाणी आणि मैदा घाला आणि त्याच्या पिठाची गोळी करून अर्धा तास वेगळे ठेवा

3) आता नान तयार करण्यासाठी तयार  राहा. दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेऊन ते हाताने चांगले कुसकरा  यामध्ये किसून थोडे पनीर टाका त्याचबरोबर कापलेला कांदा, कापलेली कोथिंबीर, मिरचीचे तुकडे, मीठ, लाल मिरची पावडर, धण्याची पावडर, आमचूर पावडर, जिरा पावडर,  काळीमिरी,  मिरची पावडर हे सर्व एकत्र चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या.

4) मैद्या पासून बनवलेल्या  कनिका ला थोडे तूप लावा पून्हा ते चांगले मळून घ्या त्यानंतर मोठी गोल रोटी तयार करा त्यावर पुन्हा थोडे तूप टाका याच बरोबर कोरडा मैदा त्यावर थोड्या प्रमाणात टाकून घ्या आणि त्यानंतर याचे गोल रोल करुन छोटे छोटे तुकड्यांमध्ये कापून घ्या

5) तुकडे स्टफिंग  करा आणि रोटी बनवण्यासाठी पुन्हा त्याचे रोल करा वरती थोडेसे लावा. आणि गरम तव्यावर ते परतून घ्या. मध्यम गॅसवर दोन्ही बाजूने ते चांगले भाजून घ्या त्यानंतर थेट गॅस वर एक मिनिटासाठी त्याला भाजून घ्या आणि  दोन्ही बाजूने क्रश करून ते आता खाण्यासाठी सर्व करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT