Breakfast  sakal
फूड

Breakfast recipe: नाश्त्यासाठी बनवा झटपट आणि फटाफट ब्रेड ढोकळा, ही आहे सोपी रेसिपी

फक्त १० मिनिटांत बनवा ब्रेड ढोकळा, जाणून घ्या झटपट रेसिपी

Aishwarya Musale

घराच्या घरी झटपट आणि सोप्या अशा रेसिपी असतात. परंतु माहिती नसल्याने आपण ते करत नाही. भारतातील लोक सकाळी सुरुवात चहाने करतात. बहुतेक घरांमध्ये, नाश्त्यासाठी ब्रेड किंवा सँडविचसारखे पदार्थ खाल्ले जाते. तुम्ही बेसनचा, मुगाचा, रव्याचा ढोकळा बनवला असेल. आता झटपट होणारा ब्रेडचा ढोकळा बनवून बघा.

ब्रेड हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तो आठवड्यातून एकदा का होईना खाल्ला जातो. पण, ब्रेडसोबत जाम, बटरच नाश्त्याला दिले जाते. तसेच तो शिल्लक राहिला तर त्याचा उपमा बनवला जातो. तूमच्याही घरात असेच होत असेल तर ब्रेडच्या काही खास रेसिपी पाहुयात.

नाश्त्याला अनेक पारंपरिक रेसिपी केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे ढोकळा. ढोकळा ही गुजराती डिश असली तरी ती इतर राज्यातही आवडीने खाल्ली जाते. आपल्या घरातील शिल्लक राहीलेल्या ब्रेडपासूनही ढोकळा बनवला जातो. तो कसा ते पाहुयात.

ब्रेडचा ढोकळा

साहित्य

ब्रेड 5 तुकडे, दही १ कप, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेले आले, हळद पावडर,हिंग,कढीपत्ता,मोहरी,चवीनुसार मीठ आणि तेल

सर्वात आधी दही घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले, हळद आणि मीठ घाला. हे तयार मिश्रण बाजूला ठेऊन द्या. आता ब्रेडचे स्लाईस घेऊन त्याचे समान चार भाग करून घ्या. गॅसवर कढई गरम करून त्यात तेल, हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करा. या फोडणीत ब्रेडचे तुकडे दह्यात बुडवून पॅनमध्ये ठेवा. दोन्ही बाजूंनी दीड ते दोन मिनिटे बेक केल्यानंतर गॅस बंद करा आणि सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : पुण्यात बकरी ईदनिमित्त पोलिसांचा चोख बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT