food esakal
फूड

धपाटे, थालीपीठ, पराठे यात नेमका फरक काय?

हे तीन पदार्थ अनेक घरांत आवडीने खाल्ले जातात

सकाळ डिजिटल टीम

थंडीच्या (winter) दिवसात हिरव्या भाज्या (vegetables) मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे मेथी(methi), पालक, मटार आदींचे पराठे हमखास केले जातात. घरोघरी बटाट्याचे परोठेही(aloo paratha) हमखास बनतात. तर काहीठिकाणी धपाटे केले जातात. थालीपीठ तर अनेक घरात आवडीने खाल्ले जाते. हे तीन पदार्थ आवडीने खाल्ले जरी जात असले तरी त्यात नेमका काय फरक आहे हे अनेकांना कळत नाही.

Thalipeeth

तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, उडदाची डाळ, चणा डाळ, धने, जिरे याचे घरानुसार प्रमाण ठरलेले असते. ते प्रमाण घेऊन हे सगळं साहित्य खमंग भाजून दळायचे. या दळलेल्या पिठाला थालिपीठाची भाजणी म्हणतात. या भाजणीत आवडीप्रमाणे तिखट, मीठ, कांदा घालून थोडं पाणी घालून पीठ एकत्र करून घ्यायचे आणि थापून थालिपीठ करायचे. हे थालिपीठ लोण्याबरोबर अतिशय चविष्ट लागते.

धपाटे

आता धपाट्यांविषयी म्हणाल तर त्यात नेहमीची कणिक, ज्वारी, बाजरी, नाचणी अशी आवडीची पिठे मिक्स करून त्यात ओवा, तीळ, तिखट, मीठ एखादी पालेभाजी असल्यास तीही घातली जाते. हे सर्व एकत्र करून थोडे जाडसर लाटून केलेले धपाटे अतिशय चविष्ट आणि पौष्टीक असतात.

पराठे

पराठ्यांबाबत सांगायचे झाल्यास बरेचसे पराठे हे भरून केले जातात. त्यात मुख्य घटक कणिक हा असतो. कणीक मळून घ्यायची आणि त्यात आवडीप्रमाणे बटाट्याचे सारण, मटारचे सारण, कांदा-चीज, कोबी अशी विविध सारणे भरली जातात. किंवा कधीकधी अनेकजण मेथी, पालकाची प्युरी करून त्यात आवडीप्रमाणे मसाले, कणीक घालून पराठा करतात. मुलांसाठी तर यात अनेक चांगले पर्याय शोधता येतात. तुम्ही रोज जी भाजी कराल ती भाजी घेऊन त्यात चीज घालून कणकेत स्टफ करून तसा पराठा देता येईल. यात तुम्ही भोपळा, गाजर, बीट अगदी वांग्याचा पराठाही देऊ शकाल.

तसे तर हे तिनही पदार्थ घराघरात आवडीने खाल्ले जातात. तुम्ही ते कसे करता आणि चव कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे. मग काय थंडीत हे पदार्थ आवर्जून करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT