Diwali Recipe 2023 esakal
फूड

Diwali Recipe 2023 : दिवाळीला करा बटाटा मसाला मठरी! एकदम सोपी आहे रेसिपी

दिवाळी म्हटलं की सर्वात आधी आठवतो, तो जिभेवर रेंगाळणारा स्वादिष्ट फराळ.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali 2023 Recipe :

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र आता दिवाळीच्या शॉपिंगची लगबग पहायला मिळत आहे. दिवाळी म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो जिभेवर रेंगाळणारा स्वादिष्ट फराळ. हा फराळ करण्यासाठी महिला नेहमी हटके रेसिपीज शोधत असतात.

जर तुम्हाला ही यंदाच्या दिवाळीमध्ये हटके पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही नेहमीचा फराळ तर बनवाच मात्र, त्यासोबत बटाटा मसाला मठरीचा पदार्थ देखील बनवा. हा पदार्थ बनवण्याची रेसिपी एकदम सोपी आहे.

शिवाय, हा पदार्थ बनवायला जास्त साहित्याची गरज भासत नाही. झटपट बनणारी बटाटा मसाला मठरीची रेसिपी जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.

बटाटा मसाला मठरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • बटाटा १ किंवा २

  • 500 ग्रॅम मैदा

  • रवा १५० ग्रॅम

  • लाल तिखट १ चमचा

  • बेकिंग सोडा अर्धा चमचा

  • तेल

  • चाट मसाला

  • ओवा

  • चिमूटभर हळद

  • चवीप्रमाणे मीठ

बटाटा मसाला मठरी बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे:

  • सर्वात आधी बटाटे उकडून घ्या. ते एका भांड्यात सोलून थंड व्हायला ठेवा.

  • त्यानंतर, मसाला मठरी बनवण्यासाठी एका भांड्यात रवा, मैदा आणि बेकिंग सोडा हे सर्व घटक चांगले मिक्स करून घ्या.

  • नंतर, यामध्ये उकडलेले बटाटे मिक्स करा. बटाटा घालून मिश्रण चांगले एकजीव करा.

  • आता, त्यामध्ये मीठ, लाल तिखट, चाट मसाला, ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घालून पीठ चांगले मळून घ्या.

  • हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतल्यानंतर ते १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा.

  • जेणेकरून ते चांगल्या प्रकारे मुरून सेट होईल.

  • पीठ सेट झाल्यानंतर, आता या पीठाचे छोटे गोळे करून तुम्हाला मठरीला जसा आकार द्यायचा आहे तसा आकार द्या.

  • आता एका बाजूला कढईमध्ये तेल घालून ती कढई गरम करायला ठेवा.

  • तेल चांगले तापल्यानंतर त्यात मठरी घालून सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • मठरी चांगली तळून झाल्यावर एका भांड्यात काढून घ्या आता तुमची बटाटा मसाला मठरी तयार आहे.

  • ही मठरी तुम्ही तशीच खाऊ शकता किंवा चहासोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT