Diwali  sakal
फूड

Diwali 2023: दिवाळीसाठी बनवा सुक्या खोबऱ्याची खुशखुशीत करंजी, ही घ्या सोपी रेसिपी

चला तर जाणून घेऊया सुक्या खोबऱ्याची खुशखुशीत करंजीची सोपी रेसिपी.

Aishwarya Musale

सर्व सणसमारंभ आपल्या देशामध्ये उत्साहात साजरे केले जातात. उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यासोबतच प्रत्येक घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वान्नांचीही चव चाखायला मिळते. यापैकीच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे 'करंजी'.

दिवाळीसह अन्य उत्सवांमध्ये हा खुशखुशीत गोड पदार्थ तयार केला जातो. मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून करंजी तयार केली जाते. चला तर जाणून घेऊया सुक्या खोबऱ्याची खुशखुशीत करंजीची सोपी रेसिपी.

लागणारे साहित्य:

- मैदा अर्धा किलो

- मीठ अर्धा चमचा

- तुपाचे किंवा रिफाईंड तेलाचे मोहन आठ चमचे

- सुक्या खोबऱ्याचा कीस तीन वाट्या

- पिठीसाखर दोन वाट्या

- खसखस तीन-चार चमचे

- कणीक पाव वाटी

- वेलची पूड एक चमचा

- तळण्यासाठी तूप वा रिफाईंड तेल

बनवण्याची पद्धत

सुरवातीला खोबऱ्याचा किस तयार करुन घ्या. त्यानंतर गार झाल्यावर हाताने कुसकरून अथवा मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घ्या.

नंतर खसखस भाजून पूड करा. तसेच कणीक भाजून घ्या. नंतर खोबऱ्याचा कीस, खसखस पूड, भाजलेली कणीक, पिठीसाखर आणि वेलची पूड एकत्र करून सारण तयार करा.

मीठ व तुपाचे मोहन घालून मैदा घट्ट भिजवा. नंतर त्याच्या लहान-लहान पुऱ्या लाटून त्यात सारण भरा. त्याला करंजीच्या आकारात दुमडून त्याचे (कड कापून) तुपात वा तेलात तळून कागदावर पसरून ठेवा.

करंजी गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. अशा पद्धतीने सुक्या खोबऱ्याच्या खुशखुशीत करंज्या तयार झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT