फूड

Diwali 2023: दिवाळीसाठी घरीच बनवा बुंदीचे लाडू, जाणून घ्या रेसिपी!

घरच्या घरी बनवता येतील असे बुंदीचे लाडू...

Aishwarya Musale

प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडी मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. 

लाडू शब्द ऐकला तरी आपल्या मनात विचार येतो काहीतरी गोड बातमी आहे. कोणतीही चांगली बातमी सांगताना काहीतरी गोड पदार्थ खातो. मग, तो पदार्थ जर लाडू असेल तर ऐकणारी बातमी अजुनच गोड वाटते! लग्न आणि लाडू यांचा फार घट्ट संबध आहे.

यंदाच्या दिवाळीच्या फराळाची तयारी घरोघरी सुरु झाली असेल. दिवाळीचा फराळामध्ये बुंदीचा लाडू हा हमखास ठरलेला असतो. चला तर मग जाणून घेऊ या बूंदीच्या लाडूची रेसिपी....

लागणारे साहित्य

प्रत्येकी दोन कप बेसन-तूप, दीड कप साखर, वेलची पूड, केशर पूड, बेदाणे, बदाम काप, चिमूटभर केशरी रंग

कृती :

बेसनमध्ये केशरी रंग टाकून त्यात पाणी घालून भजीच्या पिठाइतपत घट्ट भिजू द्या, मग कढईत तूप गरम करा. झाऱ्यावर पीठ टाकून कढईवर आपटा म्हणजे तुपात बुंदी पडतात. मंद आचेवर बुंदी कुरकुरीत तळा. चहाच्या गाळणीने बुंदी पाडल्या तर मोतीचुराप्रमाणे बारीक पडतात. बुंदी एका ताटात काढा. दरम्यान साखरेत निम्मे पाणी घालून पाक करा. त्यात वेलची, केशर, बेदाणे, बदाम, बुंदी घाला. थोडा वेळ मुरल्यावर लाडू वळा.

(संदर्भ: पुस्तक- दिवाळी फराळ, सकाळ प्रकाशन, लेखिका-जयश्री कुबेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

OBC Reservation : ओबीसी संघटना मोर्चावर ठाम, सरकारसोबत बैठकीत तोडगा नाही; श्वेतपत्रिकेचा आग्रह कायम

साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)

Anil Parab : कदमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, अनिल परब यांचे प्रत्युत्तर; त्यांची ‘नार्को’ चाचणी करावी

SCROLL FOR NEXT