Diwali Recipe 2023 esakal
फूड

Diwali Recipe 2023 : दिवाळीत पाहुण्यांचे तोंड करा गोड, बनवा मूगडाळीचा हलवा; सोपी आहे रेसिपी

यंदाच्या दिवाळीला घरी आलेल्या पाहुण्यांना मूगडाळीचा हलवा खाऊ घालू शकता.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Recipe : दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण होयं. दिवाळीमध्ये नवे कपडे, जिभेवर रेंगाळणारा फराळ, आकाशकंदील, पणत्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंची रेलचेल पहायला मिळते. अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे.

दिवाळीमध्ये विविध प्रकारचे फराळ आवर्जून बनवले जातात. या फराळासोबतच गोडाधोडाचे पदार्थ, मिठाई इत्यादी खाद्यपदार्थांची मेजवानी असते. यंदाच्या दिवाळीला घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही मूगडाळीचा हलवा खाऊ घालू शकता.

मूगडाळीचा हलवा ही जितका चांगल्या प्रकारे शिजवला जातो, तितकी त्याची चव आणखी मुरत जाते. त्यामुळे, हा हलवा आणखी स्वादिष्ट बनतो. हा मूगडाळीचा हलवा तुम्ही सहजपणे घरी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात मूग डाळ हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.

मूगडाळ हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे:

  • दूध १ कप

  • पिवळी मूगडाळ १ कप

  • केशर

  • वेलची पावडर किंवा वेलची पूड – अर्धा चमचा

  • बदामाचे बारीक काप

  • देशी तूप – अर्धा कप

  • साखर १ कप

मूगडाळीचा हलवा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • मूगडाळीचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

  • त्यानंतर, ही डाळ ३ तास पाण्यामध्ये भिजत ठेवा.

  • ३ तासांनंतर डाळ चाळणीमध्ये गाळून घ्या आणि पाणी काढून टाका.

  • आता ही मूगडाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

  • ही वाटलेली डाळ आता एका भांड्यात काढून घ्या.

  • आता एक भांडे घ्या, त्यामध्ये दूध कोमट करून घ्या.

  • आता त्यामध्ये केशर टाका आणि हे मिश्रण चांगले मिसळून घ्या.

  • हे भांडे आता बाजूला काढून ठेवा.

  • दुसऱ्या बाजूला आता एक खोलगट कढई किंवा पॅन घ्या.

  • त्यामध्ये, तूप घालून कढई किंवा पॅन गरम करायला ठेवा.

  • आता तूप वितळल्यानंतर, त्यात बारीक वाटलेली मूगडाळीची पेस्ट घालून तूपात भाजून घ्या.

  • ही डाळीची पेस्ट सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • ही डाळ चांगल्या प्रकारे शिजवण्यासाठी २५-३० मिनिटे लागू शकतात.

  • ही मूगडाळ चांगली शिजल्यानंतर त्यात १ कप दूध आणि १ कप कोमट पाणी घालून मिक्स करा.

  • त्यानंतर, पुन्हा मंद आचेवर ७-८ मिनिटे हे मिश्रण शिजू द्या.

  • त्यानंतर, डाळीत एक वाटी साखर आणि वरून केशर-दूधाचे मिश्रण, वेलची पूड घालून चांगले एकजीव करा.

  • त्यानंतर, मूगडाळ हलवा आणखी ५-१० मिनिटे शिजू द्या. त्यानंतर, गॅस बंद करा.

  • आता तुमचा स्वादिष्ट मूगडाळ हलवा तयार आहे. त्यावर, तुम्ही बदामाचे बारीक काप घालून हा हलवा सजवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rooh Afza Supreme Court verdict: सरबतचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात! रुह अफझा प्रकरणात असा निर्णय, ज्याने कर गणितच बदललं…

Spine Tail Devil Ray Fish : दुर्मीळ ‘स्पाईन टील डेव्हिल रे’ मासा विक्रीसाठी कोल्हापुरात, रिल्सवरून केलं आवाहन अन् वनविभागाची थेट कारवाई

Pune News: वाहने राज्यातच, फिटनेस परराज्याचा; आरटीओ अधिकारी-दलालांचे संगनमत, कागदोपत्री तपासणीमुळे सुरक्षा धोक्यात!

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT