Diwali  sakal
फूड

Diwali 2023: नेहमीच्या चकल्या पेक्षा जरा वेगळी झटपट होणारी कुरकुरीत पालक चकली

पालक चकली बनवा घरच्या घरी; जाणून घ्या रेसिपी

Aishwarya Musale

दिवाळीच्या फराळात चकलीचा समावेश नक्कीच होतो. दिवाळीनिमित्त बहुतांश महिलांना बाजारातून मिठाई आणि फराळाची खरेदी करायला आवडते.

पण असे काही लोक आहेत ज्यांना फराळ घरी बनवायला आवडते. अशा परिस्थितीत पालकाची चकली बनवणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पालक चकली बनवणे खूप सोपे आहे, ती आरोग्यदायी बनवण्यासाठी अनेक घटकांचा वापर केला जातो.

आज आम्ही तुमच्यासाठी पालक चकलीची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्हालाही यावेळी घरी काही ट्राय करायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

साहित्य

पालक - १ कप

मैदा - अर्धी वाटी

बेसन - १ वाटी

आले पेस्ट - 1 टीस्पून

हिरवी मिरची- चवीनुसार

लोणी - २ चमचे

जिरी - अर्धा टीस्पून

तेल - तळण्यासाठी

बनवण्याची पद्धत

चकली बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक धुवून रात्रभर भिजत ठेवा. नंतर बटाटे उकळवा आणि बारीक किसून घ्या.

चकली बनवण्यासाठी प्रथम पालकाची पाने वेगळी करून एका भांड्यात पाण्यात भिजवून घ्या.

नंतर एका भांड्यात 1 ते 2 कप पाणी आणि मीठ घालून गरम करा. नंतर त्यात पालक टाकून मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवा.

हे मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. नंतर त्यात किसलेले बटाटे घाला.

नंतर त्यात हिरवी मिरची, जिरी आणि चवीनुसार मीठ इत्यादी सर्व साहित्य टाका आणि सर्व साहित्य नीट मिसळा.

आता चकलीच्या साच्याला तेल लावून ग्रीस करा. नंतर पालकाचे मिश्रण साच्यात टाका.

उन्हात वाळवा. आता कढईत तेल गरम करून चकली मध्यम आचेवर तळून घ्या. तुमची चकली तयार आहे.

आता गरमागरम चहासोबत सर्व्ह करा. याशिवाय उपवासाच्या वेळीही खाऊ शकता.

उरलेली चकली तुम्ही जास्त काळ डब्यात ठेवू शकता. तुम्ही ते स्नॅक म्हणूनही वापरू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT