Diwali Recipe 2023 esakal
फूड

Diwali Recipe 2023 : दिवाळीला करा खमंग चटपटीत मेथी पापडी! एकदम सोपी आहे रेसिपी

दिवाळीला काही चटपटीत खायची इच्छा असेल तर मेथी पापडी नक्की ट्राय करा.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Recipe 2023 : दिवाळी म्हणजे दिव्यांचा, आनंदाचा आणि प्रकाशाचा सण होय. दिवाळीमध्ये फराळ, मिठाई आणि विविध खाद्यपदार्थांची मेजवानी असते. घरोघरी गोडाधोडाचे पदार्थ आणि फराळाचे पदार्थ आवर्जून बनवले जातात.

यंदाची दिवाळी अवघ्या ५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे, सर्वत्र दिवाळीची लगबग पहायला मिळत आहे. या दिवाळीला तुम्हाला जर काही चटपटीत आणि खुसखुशीत खायची इच्छा असेल तर चटपटीत मेथी पापडी नक्की ट्राय करा. या मेथी पापडीची रेसिपी एकदम सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊयात या मेथी पापडीची रेसिपी.

मेथी पापडी करण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • २०० ग्रॅम मैदा

  • १५० ग्रॅम बेसन

  • कसूरी मेथी – १ चमचा

  • ४-५ हिरव्या मिरच्या

  • आलं

  • कोथिंबीर

  • १ चमचा ओवा

  • चवीनुसार मीठ

  • तेल

मेथी पापडी करण्याची पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी एका बाऊलमध्ये बेसन आणि मैदा काढून घ्या.

  • हे दोन्ही घटक एकत्र करून त्यामध्ये कसूरी मेथी, मीठ आणि ओवा घाला.

  • आता हे सर्व घटक चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि त्यामध्ये तेल घाला.

  • तेलाच्या मदतीने हे सर्व पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्या.

  • तुम्हाला हवे असल्यास या पीठामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आल्याची एकत्रित पेस्ट तुम्ही यामध्ये घालू शकता.

  • आता या पीठाचे गोळे तयार करून लाटून घ्या.

  • यानंतर, कढईत तेल घालून ते गरम करायला ठेवा.

  • तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये या लाटलेल्या मेथीच्या पुऱ्या तळून घ्या.

  • या पुऱ्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

  • आता, तुमची मसालेदार आणि चटपटीत मेथी पापडी तयार आहे.

  • टोमॅटो सॉस, पुदिना चटणी किंवा गरमागरम चहासोबत तुम्ही ही मेथी पापडी खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT