Diwali Recipe 2023 sakal
फूड

Diwali Recipe 2023 : दिवाळीत करा मऊ आणि जाळीदार अनारसे, एकदम सोपी आहे रेसिपी

दिवाळीच्या फराळामध्ये मऊ आणि जाळीदार अनारसे खायला सर्वांनाच आवडते.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Recipe 2023 : दिवाळी अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपली आहे. आतापर्यंत काही घरांमध्ये दिवाळीच्या फराळाची तयारी देखील सुरू झाली असेल. घरांमधून फराळाच्या पदार्थांचा घमघमाट देखील येत असेल.

दिवाळीमध्ये अनेक जण घरच्या घरी फराळाचे पदार्थ बनवतात. मात्र, काही जण बाहेरून हे पदार्थ विकत आणतात. या बाहेरील पदार्थांमध्ये भेसळीचा धोका नाकारता येत नाही.

त्यामुळे, तुम्ही घरच्या घरी देखील गोड पदार्थ किंवा फराळाचे पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोड पदार्थाची रेसिपी सांगणार आहे, ज्याची रेसिपी एकदम सोपी आहे. या पदार्थाचे नाव आहे मऊ आणि जाळीदार अनारसे. चला तर मग जाणून घेऊयात या मऊ आणि जाळीदार अनारशांची सोपी रेसिपी.

मऊ आणि जाळीदार अनारसे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • तांदळाचे पीठ

  • १ कप साखर

  • तूप किंवा तेल

  • २ कप पाणी

  • पांढरे तीळ

  • खवा

अनारसे बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • अनारसे बनवण्यासाठी सर्वात आधी तुमच्या अंदाजाप्रमाणे तांदूळ घ्या. हे तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत घाला.

  • त्यानंतर, सकाळी तासभर फॅनखाली हे भिजवलेले तांदूळ एका सूती कापडावर पसरून वाळत घाला.

  • तांदूळ वाळल्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्या.

  • आता २ कप पाणी घ्या. त्यामध्ये १ कप साखर घाला आणि याचा छान साखरेचा पाक तयार करा.

  • नंतर, या पाकामध्ये २ वाट्या तांदळाचे पीठ घाला. आता हळूहळू हे चांगल्या पद्धतीने मिसळून घ्या. यात गुठळ्या होणार नाही, याची काळजी घ्या.

  • आता यामध्ये थोडा खवा (तुमच्या अंदाजाप्रमाणे) मिक्स करा.

  • गॅस बंद करून हे सर्व मिश्रण पीठाप्रमाणे चांगले मळून घ्या.

  • आता दुसऱ्या बाजूला या पीठाचे गोळे बनवून घ्या.

  • त्यानंतर, ते एकसमान लाटून घ्या.

  • आता कढई किंवा खोलगट पॅन गरम करायला ठेवा.

  • त्यात तूप किंव तेल घालून गरम करा.

  • त्यानंतर, लाटलेल्या अनारस्याला तिळ चिटकून घ्या आणि गरम कढईत सोडा.

  • तेलात किंवा तूपात छान सोनेरी होईपर्यंत अनारसे तळून घ्या.

  • आता तुमचे खुसखुशीत आणि जाळीदार अनारसे तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

Kolhapur : अखेर इचलकरंजीला पंचगंगेचे शुद्ध पाणी मिळणार, ६०९ कोटी रूपये मंजूर; दोन वर्षात 'झेडएलडी’ प्रकल्प पूर्णत्वास येणार

११ वर्षांत २० टक्केच अनुदान! 'नैसर्गिक टप्पा वाढीच्या निर्णयाला बगल'; आजपासून शाळा बंद ठेवून शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT