Diwali Recipe 2023 esakal
फूड

Diwali Recipe 2023 : दिवाळीत करा हेल्दी आणि टेस्टी अंजीर बर्फी! एकदम सोपी आहे रेसिपी

दिवाळीत फराळासोबत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी मिठाई आवर्जून बनवली जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali 2023 : दिवाळीला नुकतीच सुरूवात झाली आहे. दिवाळी म्हटलं की, सर्वांना आठवतो तो म्हणजे जीभेवर रेंगाळणारा फराळ. या फराळासोबत आपण अनेक प्रकारचे गोडाधोडाचे खाद्यपदार्थ आणि मिठाई आवर्जून करतो.

दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी मिठाई ही आवर्जून बनवली जाते. अनेक जण मिठाई दुकानातून खरेदी देखील करून आणतात. मात्र, घरी बनवलेल्या मिठाईची चव काही औरच असते, हो ना?

आज आपण अशीच एक बनवायला सोपी असणारी अंजीर बर्फीची रेसिपी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात अंजीर बर्फीची ही सोपी रेसिपी.

अंजीर बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • अंजीरचे बारीक तुकडे

  • दोन कप खवा

  • आवश्यकतेनुसार गूळ

  • काजूचे बारीक तुकडे

अंजीर बर्फी करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी एका खोलगट पॅनमध्ये किंवा कढईमध्ये खवा शिजवून घ्या.

  • हा खवा वितळेपर्यंत तो हलवत रहा.

  • आता खव्याचा रंग बदलायला लागला की, त्यात गरजेप्रमाणे गूळ घाला.

  • आता गूळ आणि खवा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  • हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर, त्यात अंजीरचे बारीक तुकडे, काजूचे तुकडे घालून मिश्रण पुन्हा चांगले मिसळून घ्या.

  • आता हे मिश्रण एका ताटात काढून चांगले पसरून घ्या.

  • १५-२० मिनिटांनंतर मिश्रण थंड झाल्यावर तुम्हाला हव्या त्या आकारात बर्फी कापून घ्या.

  • तुमची अंजीर बर्फी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा केंद्राचा निर्णय

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

Pali News : पतीदेव झाले कारभारी! पाच्छापूर सरपंचांच्या पतीचा ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप, आर्थिक लाभही घेतले

SCROLL FOR NEXT