Diwali Recipe 2023 esakal
फूड

Diwali Recipe 2023 : लक्ष्मीपूजनाला दाखवा 'या' खास पदार्थाचा नैवेद्य, एकदम सोपी आहे रेसिपी

आज लक्ष्मीपूजन आहे, त्यानिमित्ताने देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Diwali Recipe 2023 : दिवाळीला नुकतीच सुरूवात झाली आहे. वसूबारस, धनत्रयोदशीचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात आला. आज दिवाळीचा तिसरा दिवस अर्थात लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशीचा दिवस आहे. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही दिवस एकाच दिवशी आले आहेत.

आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची शुभ मुहूर्तावर खास पूजा केली जाते. देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. खीर, हलवा आणि शिरा या नेहमीच्या पदार्थांपेक्षा तुम्ही आज देवीला कलाकंदचा खास नैवेद्य दाखवू शकता. शिवाय, याची रेसिपी एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे. चला तर मग जाणून घेऊयात, ही रेसिपी.

कलाकंद बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • मावा – २०० ग्रॅम

  • पनीर – २५० ग्रॅम

  • साखर – १ कप

  • दूध – अर्धा कप

  • मलई – अर्धा कप

  • वेलची पावडर – १ चमचा

  • ड्रायफ्रूट्स – २ चमचे

  • तूप

कलाकंद बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी एक पॅन घ्या. त्यामध्ये, मावा घाला.

  • मावा घालून चांगला स्मॅश करून घ्या.

  • त्यानंतर, त्यात दूध, पनीर आणि मलई घाला.

  • हे सर्व चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या.

  • त्यानंतर, एक कढई घ्या, त्यामध्ये तूप घाला.

  • तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यात पनीर-मावा, दूध आणि मलईचे मिश्रण घालून मंद आचेवर शिजू द्या.

  • हे मिश्रण शिजत असताना चमच्याने हलवत रहा.

  • मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव झाल्यानंतर आणि शिजल्यानंतर त्यात १ कप साखर घाला.

  • साखर चांगली विरघळल्यानंतर आणि मिश्रणातील दूध आटल्यानंतर त्यात वेलची पावडर घाला.

  • आता, मिश्रण पुन्हा १० मिनिटांसाठी चांगले शिजू द्या. त्यानंतर, गॅस बंद करा.

  • आता हे कलाकंदचे मिश्रण थंड होण्यासाठी एका ताटात काढून ठेवा. थंड झाल्यानंतर कलाकंद सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train Tunnel : समुद्राखालील बुलेट ट्रेन बोगद्याला वेग; दुसऱ्या टीबीएमने खोदकामाला सुरुवात

Rohit Sharma Retirement: 'सचिन-गावसकरही गेले, रोहितलाही जावं...' हिटमॅनच्या निवृत्तीच्या चर्चांवर कपिल देव यांचं विधान चर्चेत

Ahmedabad Fire: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग; स्फोटांनी हादरला परिसर, ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, कुठे घडली घटना?

Mumbai News: केईएमच्या कारभाराची मध्यरात्री पाहणी, डॉक्टरांची अनुपस्थिती; रुग्णांच्या उपचारात विलंब

Mumbai News: बदनामी करू नका, महेश ट्युटोरियलन्सने ३३ शाखा बंद करण्याचं सांगितलं कारण; मुंबईत ३० हजार क्लासेस सुरू

SCROLL FOR NEXT