Diwali Recipe 2023  esakal
फूड

Diwali Recipe 2023 : यंदाच्या दिवाळीला करा कुरकुरीत शंकरपाळ्या! एकदम सोपी आहे रेसिपी

दिवाळीच्या फराळाला शंकरपाळी शिवाय मजा नाही, बरोबर ना?

Monika Lonkar –Kumbhar

Diwali 2023 : दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. दिवाळीमध्ये फराळ, नवे कपडे, आकाशकंदील, गोडाधोडाचे खाद्यपदार्थ यांची नुसती रेलचेल असते. दिवाळीमध्ये हमखास फराळ बनवला जातो. या फराळामध्ये विविध प्रकारचे पदार्थ आवर्जून बनवले जातात. चिवडा, चकली, करंजी, लाडू, शेव आणि शंकरपाळी.

शंकरपाळी शिवाय, दिवाळीच्या फराळाला मजा नाही हो ना. ही शंकरपाळी खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हावी यासाठी अनेक महिला प्रयत्न करत असतात. आज आम्ही तुम्हाला खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळी करण्याची खास रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात ही रेसिपी.

शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • साजूक तूप किंवा तेल

  • चवीनुसार मीठ

  • पिठी साखर (अर्धा किंवा १ वाटी)

  • अर्धा किलो मैदा

  • अर्धी वाटी दूध

शंकरपाळी बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी एका खोलगट कढईत किंवा परातीमध्ये मैदा घ्या.

  • आता या मैद्यामध्ये मीठ आणि पीठ साखर घाला.

  • त्यानंतर, तुमच्या अंदाजाप्रमाणे तूप किंवा तेल घ्या.

  • हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करा.

  • मिश्रण चांगले एकजीव होण्यासाठी त्यामध्ये लागेल तसे दूध घाला.

  • दूधामुळे शंकरपाळीचे पीठ मऊ होण्यास मदत होते आणि ते जास्त घट्ट होत नाही.

  • आता तुमचे पीठ चांगले एकजीव करून मळून घ्या.

  • आता १०-१५ मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवा.

  • दुसऱ्या बाजूला कढई किंवा खोलगट पॅनमध्ये तूप किंवा तेल घालून कढई गरम करायला ठेवा.

  • त्यानंतर, शंकरपाळीच्या पीठाचे गोळे बनवून घ्या.

  • आता एक गोळा लाटून घ्या. आता सुरीच्या मदतीने तुम्हाला हव्या त्या आकारात शंकरपाळी कापून घ्या.

  • आता या कापलेल्या शंकरपाळीचे तुकडे कढईमध्ये गरम तेलात किंवा तूपात घालून तळून घ्या.

  • सोनेरी रंग येईपर्यंत शंकरपाळी खरपूस पद्धतीने तळून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.

  • तुमची खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT