Diwali Recipe Esakal
फूड

Diwali Recipe: घरच्या घरी कुरकुरीत खमंग मसाला शेव कसे तयार करायचे?

कुरकुरीत खमंग शेव कोणालाही सहज जमण्या सारखी आहे. शेवासाठी कमी साहित्य लागत आणि शेव खूप पटकन तयार देखील होतात.

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीच्या फराळामध्ये चकली ,करंजी, बेसन लाडू , चिवडा हे जरी मानाचे सरदार असले तरी चिवड्याची लज्जत आणखी वाढवणारी शेव ही आपले चिवड्या बरोबरचे अस्तित्व मानाने टिकवून आहे.

कुरकुरीत खमंग शेव कोणालाही सहज जमण्या सारखी आहे. शेवासाठी कमी साहित्य लागत आणि शेव खूप पटकन तयार देखील होतात. आपण दिवाळी स्पेशल खास पारंपरिक पदार्थाच्या काही वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्यातील नववी रेसिपी आहे, दिवाळी स्पेशल घरच्या घरी मसाला शेव कसे तयार करायचे?

साहित्य:

1) दोन वाट्या बेसन

2) ओवा,जिरं,लसुण वाटून तो अर्धी वाटी पाण्यात मिक्स करून ते पाणी गाळून घेणे 

3) चवीनुसार मीठ

4) हळद 

5) तिखट

6) तेल

कृती:

एका ब्लाउल मध्ये बेसन, मीठ, तिखट, हळद हे सगळं एकत्र करून घ्यावे. त्यात चार चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. ते मोहन सगळ्या पीठाला चांगले चोळून घ्यावे. ओवा गाळून घेतलेलं पाणी त्यात घालावे. नंतर गरजे प्रमाणे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ घट्ट नको थोडं सैलसर च असावे . हे पीठ दहा मिनिटं ठेवून द्यावे. चकलीच्या सोऱ्यात शेवेची बारीक जाळी घालून पीठ त्यात भरावे आणि गरम तेलात शेव पाडून शेव तळून घ्यावी.

अशा रितीने कुरकुरीत खमंग मसाला शेव तयार झालेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT