karanji vada  sakal
फूड

Diwali Recipe 2023 :यंदाच्या दिवाळीला बनवा सर्वात हटके करंजी वडा; ही आहे रेसिपी

यंदाच्या दिवाळीला बनवा अनोखा करंजी वडा

Aishwarya Musale

सुख-समृद्धी वैभावाचं प्रतीक असलेली करंजी लक्ष्मी पूजनाला नैवेद्यासाठी केली जाते. गरीब असो की श्रीमंत, लेक-जावयाचं कौतुक करायचं असेल किंवा घरात आनंदाचा सण असेल करंजीचा मान वेगळाच. दिवाळीसाठी आज आपण करंजी वडा कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत.

करंजी वडा बनविण्यासाठी साहित्य -

मैदा- वाटी, रवा - अर्धा वाटी, दूध - १ वाटी, तुप - १ वाटी, खोबऱ्याचा किस - २०० ग्रॅम, गुळ - २५० ग्रॅम, मीठ, तेल - २५० ग्रॅम, काजु, बदाम.

कृती -

सर्वप्रथम 2 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये अर्धा वाटी रवा घालावा. यासह चवीपुरते मीठ अन् दुध कोमट करुन त्यात घालावे व दुधाच्या सहाय्याने करंजी वडासाठीचे पीठ मळून घ्यावे. यात पाण्याचा वापर करु नये. पीठ मळल्यानंतर ते ओल्या कपड्यात २ तास झाकून ठेवावे म्हणजे ते चांगले मुरेल. तोवर आपण यासाठी लागणारे सारण तयार करुया.

गॅस वर कढई ठेवावी, त्यात दोन चमचे तुप घालावे. यात गुळ अन् खोबऱ्याचा किस घालून हे सारण मंद आचेवर छान सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्यावे. या सारणाला सोनेरी रंग आल्यानंतर गॅस बंद करावा. काजु, बदामचे बारीक तुकडे करुन यात घालावे. करंजी वडा साठीचे आपले सारण तयार आहे.

यानंतर आपण मुरवण्यासाठी ठेवलेले पीठ घ्यावे. त्याच्या पुरीच्या आकाराच्या दोन पोळ्या लाटून एका त्यातील एका भागावर तयार केलेले सारण घालावे. त्यानंतर दुसरी पोळी त्यावर ठेवावी. त्यांच्या किनारांना दुधाचा हात लावून ते एकमेकांना चिकटवावे व फोर्कच्या साहाय्याने त्याची किनार व्यवस्थित दाबुन घ्यावी.

अशाप्रकारे तयार केलेल्या पिठ आणि सारणाचे अजुन वडे तयार करुन घ्यावे यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात २५० ग्रॅम तेल घालावे. तेल गरम झाल्यावर मंद आचेवर तयार केलेले वडे तळून घ्यावे. छान सोनेरी रंग आल्यानंतर ते कढईतू काढून घ्यावे. अशा रितीने छान असे करंजी वडे आपले तयार होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT