drinking 
फूड

मद्यपान केल्याने मेंदूवर परिणाम होतो का? रिसर्च सांगतो...

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याविषयी अभ्यास केला

सकाळ डिजिटल टीम

आजकाल मद्यपान सर्व वयोगटांतील लोकं करतात. पण मद्यपान करताना मर्यादित प्रमाणात पिणं जास्त महत्वाचं असतं. मद्य तुमच्या तब्येतीवर (Health) कश्यापद्धतीने परिणाम करतं याविषयी अनेकांना माहिती आहे. पण नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार कमी किंवा मध्यम प्रमाणात मद्यपान (Alcohol) केल्याने मेंदूचे (Brain)नुकसान होते.

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला असून एकूण ३६ हजारांपेक्षा जास्त प्रौढ व्यक्तींचा डेटा यावेळी वापरला गेला. त्यावरून असा, दावा करण्यात आला आहे की, दररोज एक किंवा दोन पेग मद्यपान केल्याने व्यक्तीच्या मेंदूमध्ये दोन वर्षांइतकेच बदल होतात. .संशोधकांचे म्हणणे आहे की जास्त मद्यपान करणाऱ्या लोकांच्या मेंदूची रचना आणि आकारही बदलतो, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमजोर होते. या अभ्यासाचे निष्कर्ष नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. अमेरिकेच्या पेन्स व्हार्टन स्कूलचे प्राध्यापक सदस्य, अभ्यासाचे लेखक गिडॉन नेव्ह यांच्या मते, बिअरची अर्धी बाटली प्यायल्याने काय प्रभाव होतो याचे विश्लेषण करण्यासाठी आमच्याकडे मोठ्या संख्येने उदाहरणे आणि आधार आहे.

drink alcohol

जाणकार काय सांगतात?

पेन सेंटर फॉर स्टडीज ऑफ अॅडिक्शनचे संचालक हेन्री क्रॅन्झलर म्हणतात, 'अभ्यासाचे निष्कर्ष मद्यपानाच्या सुरक्षित मर्यादांबाबत वैज्ञानिक आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहेत. उदाहरणार्थ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन अल्कोहोल अ‍ॅब्यूज अँड अल्कोहोलिझम महिलांना एक पेग अल्कोहोल पिण्याची परवानगी देते, तर पुरुषांसाठी हे प्रमाण दुप्पट आहे. पण, ही मर्यादाही मेंदूला हानी पोहोचवता, असे अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात.

या अभ्यासात पिणे आणि मेंदूचे आरोग्य यांचे संबंध तपासले गेले. अभ्यासात शास्त्रज्ञांना जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूच्या संरचनेत बदल होत असल्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. सर्वेक्षणात हभागी झालेल्या लोकांनी .त्यांच्या मद्यपान सेवनाच्या पातळीविषयी प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामुळे अभ्यासाचे सह-लेखक रेमी डेविट म्हणतात की, मेंदूवर मद्यपानाचा परिणाम घातक असल्याचे काही पुरावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT