Dudhi-Methi Paratha recipe food healthy  sakal
फूड

Swasthyam 2023 : दुधी-मेथी पराठा

सकाळ वृत्तसेवा

साहित्य : १ वाटी किसलेला दुधी, १ वाटी चिरलेली मेथी, चवीनुसार मीठ, तिखट, साखर, लिंबू, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा हळद, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, १ चमचा तेल, थोडी चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा ओवा

पारीसाठी ः पराठ्याची भिजवलेली कणीक

कृती ः

कोथिंबिरीशिवाय सारणाचे सर्व साहित्य एकत्र मिसळून कोरडे होईपर्यंत परतून घ्यावे किंवा ४ ते ५ मिनिटे हायवर मायक्रोवेव्ह करा. नंतर कोथिंबीर मिसळून गार करा.

कणकेच्या लिंबाएवढ्या गोळीत तिच्या दुप्पट सारण भरून पोळीपेक्षा जाड पराठा लाटा. (या पद्धतीने नीट लाटता न आल्यास किंवा सारण कडेपर्यंत न पसरल्यास मोठी पोळी लाटून मध्यात सारण पसरून त्यावर कडेची पोळी झाकून पाकीट पराठा बनवा.)

तव्यासह पराठा दोन्ही बाजूने किंचित भाजून नंतर त्यावर दोन्ही बाजूने तेल सोडून मध्यम आचेवर सोनेरी रंगावर भाजा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT