फूड

ब्रेकफास्टसाठी झटपट तयार होणारे फ्लॉवर पराठे; जाणून घ्या रेसिपी

लहान मुलांसह घरातील मोठी व्यक्तीही या पदार्थाला पसंती देतात

स्नेहल कदम

दररोच सकाळच्या नाश्तासाठी कोणते नवे पदार्थ बनवावे ही समस्या सर्रास महिलांसमोर असते. रोजचेच कॉमन पदार्थ खाल्ल्याने काहीतरी वेगळे खाण्याचा मुड असतो. परंतु वेळेअभावी आपण काही नवीन पदार्थ ट्राय करणे टाळतो. मात्र अशा बऱ्याच रेसिपी आहेत ज्या तुम्ही घरी अगदी कमी वेळात तयार करु शकता. शिवाय घरी उपलब्ध असणारे घटक आणि वस्तुंपासून हे पदार्थ बनवता येतात. पावभाजी, बटाटेवडा, मिसळ, डोसा, आंबोळी असे अनेक पदार्थ बनवण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे आपण नाश्ताची गरज पोहे, उपमा यांवरत थांबवतो. परंतु काही वेळातच हलका फुलका तयार होणार पदार्थ म्हणजे फ्वॉवर पराठे. ही एक टेस्टी, कमी वेळात बनणारी आणि सर्वांना आवडणारी डीश आहे. लहान मुलांसह घरातील मोठी व्यक्तीही या पदार्थाला पसंती देतात. चला तर झटपट तयार होणारी फ्लॉवर पराठे रेसिपी पाहूयात..

साहित्य -

  • फ्लॉवर २ कप

  • लाल तिखट चवीनुसार

  • मीठ चवीनुसार

  • हिंग, जिरे, धने पावडर आवश्यकतेनुसार

  • तेल आवश्यकतेनुसार

  • बारीक चिरलेला कांदा २

  • बारीक चिरलेली कोथिंबीर आवश्यकतेनुसार

  • चिरलेली हिरवी मिरची २

  • आलं - लसून पेस्ट आवश्यकतेनुसार

  • गव्हाचे पीठ ४ कप

कृती -

सुरुवातील फ्लॉवर स्वच्छ धूवून किसनीनच्या मदतीने त्याला बारीक किसुन घ्या. त्यानंतर गव्हाचे पीठ मळून त्याची सैलसर कणिक मळून घ्या. आता किसलेल्या फ्लॉवरमध्ये लाल तिखट, मीठ, आलं लसून पेस्ट, चिरलेला कांदा, मिरची घाला. या तयार मिश्रणात वरून हिंग, जिरे, धने पावडर घाला. हे पराठ्यासाठी तुमचे सारण तयार आहे. आता पोळपाट घेऊन त्यावर तयार पीठाच्या छोट्या आकाराच्या पोळ्या लाटून घ्या. यातील एका पोळीवर हे तयार सारण पसरवा आणि यावर दुसरी पोळी उपडी ठेवा. यानंतर पुन्हा अलगत त्या पोळीला हळुवार लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्या. पॅन गरम झाल्यानंतर त्यात हा तयार पराठा भाजून घ्या. भाजताना त्यावर तेल सोडा. मोठ्या गॅसवर दोन्ही बाजूंनी याला भाजावे. तयार गरमा गरम पराठा तुम्ही दही किंवा सॉस सोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT