फूड

काही मिनिटांत घरीच बनवा मोहब्बत सरबत; जाणून घ्या सोपी रेसिपी

या दिवसात रमजान महिना सुरू आहे, यादरम्यान याचे सेवन तुम्ही करू शकता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गरमीच्या दिवसात थंड पेयांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते. भारतामध्ये साधारणत: लिंबू सोडा पासून ते ताक, लस्सी, लिंबूपाणी असे काही मिनिटांत तयार होणारे पेयांचे सेवन केले जाते. यांचे सेवन केल्याने गरमीपासून कमी अधिक प्रमाणात आराम मिळायला मदत होते. हे पेय साधारणतः दही बेस्ड असतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, की अनेक फळांपासून तुम्ही ज्यूस किंवा ड्रिंक्स तयार करू शकता. असेच एक लोकप्रिय फळ म्हणजे कलिंगड. या हंगामामध्ये उपलब्ध असते आणि ज्याला लोक अधिक पसंती देतात. कलिंगड खाण्यासाठी तर उपयोगी पडतेच शिवाय तुम्ही यापासून रिफ्रेशिंग ड्रिंक्स बनवू शकता. आणि त्यालाच मोहब्बत शरबत असे म्हटंले जाते.

मोहब्बत का शरबत हे एक फेमस ड्रिंक आहे. ज्याचा उपयोग गरमीच्या दिवसात अधिक प्रमाणात केला जातो. गुलाबी रंगाचे दिसणारे हे ड्रिंक जितकं सुंदर दिसतं तितकं ते पिण्यासाठी स्वादिष्ट आहे. हे बनवणे अगदी सोपे आहे. रोज सिरप, दूध, कलिंगडचे छोटे छोटे तुकडे याचा स्वाद वाढवण्याचं काम करतात. काही मिनिटांत तयार होणारे ड्रिंक आहे. गरमीच्या दिवसात तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा हे देऊ शकता. तसेच तुम्ही कोणत्याही सणाच्या दिवशी हे ड्रिंक बनवू शकता. जसे की आपल्याला माहीत आहे या दिवसात सध्या रमजान महिना सुरू आहे. यादरम्यान याचे सेवन तुम्ही करू शकता.

कसा बनवाल मोहब्बत सरबत

  • सर्वात आधी कलिंगडच्या तुकड्यांना छोट्या आकारात कापून घ्या.

  • त्यानंतर बाउलमध्ये एक कप दूध घ्या आणि यामध्ये रोज सिरप आणि बर्फाचे काही तुकडे टाका.

  • आता या मिश्रणात टाकून ते उत्तमरीत्या एकत्र करून घ्या.

  • थंडगार असा मोहब्बत शरबत तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: विधान परिषद जागावाटपावरून महायुतीत तणाव! शिंदेंनंतर संकटमोचक महाजन दिल्लीला रवाना; कोणत्या जागेवर पेच वाढला?

KKR vs DC: KL Rahul बरसला! अखेरच्या सामन्यात दिल्लीचे कोलकातासमोर मोठे लक्ष्य; पण शेवट गोड कोण करणार?

Solar Power Project : गणेशवाडी उपकेंद्रात ९ मेगावॉट सौर प्रकल्प कार्यान्वित; गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा

Shri Krishna Janmostav: श्रीक्षेत्र देवगडात श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तिभावात; भागवत कथेला भाविकांची गर्दी,शिस्तबद्ध नियोजनाने देवगड नगरी नटली

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

SCROLL FOR NEXT