सूजी टिकिया 
फूड

'हे' आहेत सूजीपासून बनवले जाणारे स्नॅक्स

सकाळ डिजिटल टीम

सूजी हा शद्ब कानावर पडताच पहिल्यांदा आठवते सूजीचा हलवा. त्याने केवळ हलव्याच्या रेसिपीच बनवल्या जातात.

सूजी (Sooji Recipe In Marathi) हा शद्ब कानावर पडताच पहिल्यांदा आठवते सूजीचा हलवा. त्याने केवळ हलव्याच्या रेसिपीच बनवल्या जातात. मात्र त्यापासून अनेक इतर रेसिपीजही बनवल्या जाऊ शकतात. (Easy Way To Make Various Sooji Recipes) तर चला त्या रेसिपीजविषयी जाणून घेऊया..

सूजीची टिकिया

साहित्य - सूजी २ कप, आद्रक-लसूण पेस्ट-१/२ चमचे, हिरवी मिरची-२ (बारीक केलेली), जिरा पावडर- १/२ चमचे, चाट मसाला - १/२ चमचे, मीठ -चवीनुसार, अजवैन-१/२ चमचे, तेल - २ कप

कृती

-सर्वप्रथम एक पॅन गरम करा. त्यात सूजी चांगल्या प्रकारे भाजून घ्या.

- आता एका कढाईत तेल गरम करुन त्यात आद्रक-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि अजवैन टाकून भाजून घ्या.

- काही वेळेनंतर सूजीबरोबर मीठ, जिरा पावडर आणि एक कप पाणीही टाकून काही वेळ शिजून घ्या

- शिजल्यानंतर या मिश्रणापासून टिकिया बनवून घ्या.

- आता तुम्ही दुसऱ्या कढाईत तेल गरम करुन टिकियाला सोनेरी रंग येईलपर्यंत फ्राय करुन घ्या.

सूजीची इडली चाट

साहित्य

- सूजी १ कप, दही - १ कप, सोडा - चिमुटभर, मीठ - चवीनुसार, मोहरी - १/२ चमचे, कढीपत्ता - ७, कांदा - १( बारीक कापलेला), मिरची पावडर - १/२ चमचे, आद्रक पेस्ट, तेल - २ चमचे

कृती

- सर्वप्रथम तुम्ही एका भांड्यात सूजी, दही आणि पाणी घ्या. हे सर्व चांगल्या प्रकारे एकत्र करा.

- आता हे सर्व मिश्रण इडलीच्या भांड्यात टाकून जवळपास १०-१५ मिनिटांसाठी वाफेवर शिजवा.

- तडक्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची आणि आद्रक टाकून चांगल्या प्रकारे शिजवून घ्या.

- आता तयार इडलीला तडका द्या आणि खाण्यासाठी वाढा

नमकीन सूजी मफिन्स

साहित्य

- सूजी - दोन कप, तूप - २ चमचे, साखर - १ चमचा, पीठ- १/२ कप, मिरची पावडर -१ चमचा, कांदा - १ बारीक कापलेला, दही- १/२ कप, हळदी - १/२ चमचा, ओरेगेना - १ चमचा, मीठ - चवीनुसार, बेकिंग पावडर - १/२ चमचा

कृती

- सर्वप्रथम पॅनमध्ये सूजी आणि पीठ टाका चांगल्या प्रकारे भाजून घ्या.

- आता भाजलेले पीठ सुजीत दही, साखर, मीठ, बेकिंग पावडर आदी साहित्य पाण्यात टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा.

- कांदा चांगल्या प्रकारे मफिन बटरमध्ये मिक्स करुन घ्या.

- आता मफिन बटरला मफिन्स साच्यात टाकून ओव्हनमध्ये जवळपास १५ मिनिटे बेक होण्यासाठी ठेवा.

- १५ मिनिटानंतर ती काढा. खाण्यासाठी तयार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balochistan Blast : बलुचिस्तानात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर मोठा हल्ला; २३ जवानांचा मृत्यू , BLAचा हात असल्याचा संशय

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

SCROLL FOR NEXT