Leftover Roti Bakarwadi sakal
फूड

Sunday Evening Snack: संध्याकाळच्या भूकेची करा अशी सोय, चहासोबत तयार करा लेफ्टओव्हर पोळीच्या बाकरवडी

Sunday Evening Snack: तुमच्या घरी कधी सकाळी केलेल्या पोळ्या शिल्लक राहिल्या असतील तर ही बाकरवाडीची रेसिपी नक्की ट्राय करा.

Anushka Tapshalkar

Leftover Roti Bakarwadi: बऱ्याचदा सकाळी बनवलेल्या पोळ्या तशाच राहतात मग त्यापासून काय बनवायचे असा प्रश्न पडतो. दरवेळेस फ्रँकी आणि पिझ्झा करायचं थोडा किचकट आणि कंटाळवाणे होते. म्हणून तुमच्यासाठी ही खास रेसिपी. तुमच्या घरी कधी सकाळी केलेल्या पोळ्या शिल्लक राहिल्या असतील तर ही बाकरवाडीची रेसिपी नक्की ट्राय करा.

पोळीची बाकरवडी बनवण्याचे साहित्य

उरलेल्या पोळ्या

बेसन पीठ

तांदळाचे पीठ

मीठ

आलं आणि मिरचीची पेस्ट

लाल मिरची पावडर

धणेपूड

जिरेपूड

आमचूर पावडर

बारीक चिरलेली कोथिंबीर

पाणी

तेल

पोळीची बाकरवडी बनवण्याची कृती

सर्व प्रथम बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, धणेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळे पाणी घालून सारण तयार करा. नंतर एक पोळी घेऊन त्यावर हे सारण एकसारखे सगळीकडे लावा आणि त्याचा रोल तयार करा. असे बाकी सगळ्या पोळ्यांचे रोल तयार करा. आता एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यावर एका चाळणीमध्ये हे सगळे रोल वाफेवर शिजवा आणि त्याचे काप करून घ्या. नंतर कढईमधे तेल गरम करा. हे काप कुरकुरीत आणि ब्राउनिश होईपर्यंत तळा. तुमच्या पोळीच्या बाकरवडी आता तयार आहेत. संध्याकाळच्या चहासोबत हा एक उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Tourists in Uttarakhand Video : मोठी बातमी! उत्तराखंडमधील महासंकटात अडकले महाराष्ट्रातील दहा पर्यटक

Uttarkashi Cloudburst Latest Update : उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार! ५० पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता, १० भारतीय लष्काराच्या जवानांचाही समावेश...

Latest Maharashtra News Updates Live : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले

Best Employees Morcha: बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचा आझाद मैदानात मोर्चा, काय आहेत मागण्या?

Ganeshotsav: कृत्रिम तलावांची संख्या वाढणार, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मनपाची तयारी

SCROLL FOR NEXT