फूड

दुधी भोपळ्यापासून बनवा कचोरी; लहान मुलं आवडीने खाईल

नीलेश डाखोरे

नागपूर : सकाळी, सायंकाळी अनेकांना नाश्ता करण्याची सवय असते. ऑफिसला असणारे तर मनात येईल तेव्हा नाश्ता करीत असतात. नाश्त्यासाठी कोणत्याही कारणाची त्यांना गरज नसते. अनेकांना नाश्त्यामध्ये कचोरी खायला आवडते. तुम्ही कचोरी खाऊन कंटाळले असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास दुधी भोपळ्याची कचोरी...

बहुतांश घरांमध्ये लहान मुलं दुधी भोपळा पाहून तोंड हेकडं वाकडं करतात. फक्त दुधी भोपळाच नव्हे तर इतर भाज्या पाहूनही ते असेच वागत असतात. मात्र, समोसा, कचोरी, फास्टफूड पाहून ते खूश होतात. मुलांना फक्त अशा गोष्टी आवडतात ज्या पाहण्यास आणि चव घेण्यासाठी छान असतात. मात्र, लवकीत असे काही गुण नसतात. त्यामुळे मुलं त्याला नापसंत करतात.

दुधी भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी असतात. याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. याचा ज्यूस पिल्याने ऊर्जा टिकून राहते आणि शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. तसेच पचनशक्ती सुधारते. ही निरोगी भाजी मुलांना खायला द्यायची असेल तर त्यांना वेगळ्या शैलीत तयार करा आणि खायला द्या.

लागणारी सामग्री

एक मध्यम किसलेले खवणी, किसलेले दोन पाकळ्या लसूण, भाजलेले जिरे, लाल मिरची, हळद पावडर, मीठ व तेल.

अशी करा तयार

सुरुवातीला मध्यम आकाराच्या दुधी भोपळ्याची साल सोलून घ्या. खवणीच्या साहाय्याने दुधी भोपळ्याला एका भांड्यात किसून घ्या. जास्त बिया दिसल्यास त्या काढून टाका. आता दुसऱ्या भांड्यात दोन कप मैदा टाका आणि एक वाटी किसलेली दुधी भोपळा टाका. अस करताना दुधी भोपळा जास्त होणार नाही याची काळजी घ्या. असे न झाल्यास कचोरी चांगली होणार नाही.

यात किसलेल्या लसणाच्या दोन पाकळ्या टाका. त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची, चवीनुसार मीठ, भाजलेले जिरे, हळद टाकून चांगले मिक्स करा. पीठ मळताना पाण्याचा वापर अजिबात करू नका. कणीक मळण्यासाठी दुभी भोपळ्याचे पाणी वापरा. कणीक ओले झाले तर त्यात अधिक पीठ टाकता येईल. आता ही कणीक दहा मिनिटांसाठी ठेवून द्या. दहा मिनिटांनंतर लहान लहान गोळे करून पुऱ्या बनवा. आता एका कढईत तेल गरम करा आणि पुऱ्या टाका. या पुऱ्या तेलात हलक्या सोनेरी होईपर्यंत तळा आणि काढून घ्या. तुम्हाला इच्छित असणाऱ्या चटणीसोबत या कचोरी खा. तसेच लोणच्याबरोबरही कचोरी सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT