Jeera Rice Recipe In Marathi 
फूड

सगळ्यांच्या आवडीचा जीरा राईस, 'या' पद्धतीने बनवा घरच्या घरी

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद - जीरा राईस एक पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थ आहे. यात तांदूळ आणि जिऱ्याचा उपयोग केला जातो. ही रेसिपी खूपच साधी आहे. मात्र या भातात जिऱ्याचा फ्लेवर टाकला जातो.

मुख्य साहित्य
- एक कप तांदूळ

साहित्य
- दोन मोठे चमचे पाणी
- चार हिरव्या मिरच्या
- एक छोटा चमचा जिरा
- आवश्यकतेनुसार मीठ
- एक मोठा चमचा तूप

स्टेप - १
एका कुकरमध्ये एक चमचाभर तूप टाका आणि ते गरम करा. यात दोन चमचे जीरा टाका. यानंतर जिऱ्याला तडका मिळाल्यानंतर वरुन हिरवी मिरची टाका. आता अगोदर धुतलेले तांदूळ कुकरमध्ये टाका आणि चांगल्या प्रकारे पळीने एकत्र करुन घ्या.

स्टेप २
जेव्हा तांदळात जीरा चांगल्या प्रकारे एकत्र झाल्यास त्यात चवीनुसार मीठ टाका. आता यात थोडे पाणी टाका आणि कुकरचे झाकण लावा. कुकरचे तीन ते चार शिट्या होईपर्यंत भात शिजून द्या.  त्यानंतर गॅस बंद करा आणि त्यास थंड होऊ द्या. पूर्ण वाफ निघून गेल्यानंतरच कुकरला हात लावा.

स्टेप ३
त्यानंतर एका छोटेशे पॅन घ्या आणि त्यात तूप टाका. आता तूप गरम करुन घ्या. जेव्हा तूप चांगल्या प्रकारे गरम होईल. त्यात काजू टाका आणि ते भाजून घ्या.

स्टेप ४
यानंतर कुकरमधील जीरा राईसला तुपात भाजलेले काजूबरोबर गार्निश करा. तर तुमचा जीरा राईस तयार. तुमच्या आवडीच्या करीबरोबर तुम्ही आता खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT