Food Recipe news esakal
फूड

Food Recipe : बनवा पालक पनीर दम बिर्याणी फक्त ३५ मिनिटात

शाकाहारी असो किंवा मांसाहारी बिर्याणी ही प्रत्येकाला आवडणारी डिश

सकाळ डिजिटल टीम

शाकाहारी असो किंवा मांसाहारी बिर्याणी ही प्रत्येकाला आवडणारी डिश आहे. बिर्याणी वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या गोष्टींनी बनवली जाते. अशीच एक रेसिपी म्हणजे पालक पनीर दम बिर्याणी. केवळ ३५ मिनिटांत बनवा ही स्पेशल रेसिपी, घरच्याघरी.

सामग्री :

तांदूळ, पालक, पनीर, मटार, गाजर, कोबी, १ चमचा लिंबाचा रस, १ तमालपत्र, ३ लवंगा, २ वेलदोडे , २ वेलची, ६ काळया मिऱ्या, १/२ टीस्पून जिरे, २ पळी तेल, १ टेबलस्पून देशी तूप, १/२ टीस्पून लाल मिरची, १ चमचा धने पावडर, १ टीस्पून बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पाने, २ कप पाणी

कृती :

१. एक चमचा तेल आणि देशी तूप घालून भांडे गरम करा आणि सर्व मसाले घालून तळून घ्या

२. पालक पाण्यात उकळून त्याची प्यूरी करून घ्या आणि ती या मसाल्यांमध्ये घाला थोड्या वेळाने शिजल्यावर त्यात तांदूळ घाला आणि मिक्स करा त्यावर झाकण ठेवा आणि शिजू द्या.

३. तोपर्यंत दुसऱ्या बाजूच्या पॅनमध्ये तेल गरम करून पनीर शॅलो फ्राय करून बाजूला ठेवा. दुसरीकडे, भाज्यांना शिजवून घ्या.

४. तांदूळ थोडा शिजल्यानंतर गॅस मंद करा. यानंतर, ज्या पॅनमध्ये पनीर शॅलो फ्राय केले होते त्या पॅनमध्ये आले लसूण पेस्ट घाला आणि फ्राय करा.

५. उकडलेल्या भाज्या घाला आणि त्याही फ्राय करा म्हणजे त्या थोड्या कुरकुरीत होतील. बिर्याणी मसाला, हळद, तिखट, धनेपूड आणि मीठ घालून भाज्या छान मिक्स करा. चवीनुसार मीठ घालून त्यावर तळलेले कांदे टाका.

६. सर्व गोष्टी नीट मिक्स केल्यानंतर तांदूळ थोडा वेळ मंद आचेवर शिजवून घ्या आणि गॅस बंद करा.

७.थोडं देशी तूप त्यावर घाला आणि रायत्याबरोबर सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

SCROLL FOR NEXT