Punjabi Tadka Maggi  Esakal
फूड

Food: सायंकाळच्या चहासोबत ट्राय करावी अशी ‘चटपटीत पंजाबी तडका मॅगी’

बीन मौसम बरसात’ सुरू असताना काहीतरी चमचमीत, चटपटीत खायची इच्छा प्रत्येकाला होतेच.

सकाळ डिजिटल टीम

बीन मौसम बरसात’ सुरू असताना काहीतरी चमचमीत, चटपटीत खायची इच्छा प्रत्येकाला होतेच. हा पण, पाऊस आणि भजी हे कॉम्बिमेशन प्रसिद्ध असले तरीही इतर नवे पदार्थ नक्की ट्राय करायला पाहीजेत. आज अशीच एक रेसिपी ट्राय करूयात. 

कोणत्याही रेसिपीला पंजाबी तडका दिला तर त्याची चव अजूनच वाढते. तसे पाहीले तर, मॅगी ही चायनिज पदार्थ आहे. या चायनिज पदार्थाला देसी पंजाबी तडका दिला तर एक नवी चव इन्वेंट होईल. या रेसिपीचे नाव पंजाबी तडका मॅगी असून पटकन रेडी होणारी ही रेसिपी आहे. तशी मॅगी तर २ मिनीटातच तयार होते. पण, ही मॅगी पासून बनणारी जरा हटके रेसिपी असल्याने याची नविन आणि वेगळी चव तूम्हाला नक्की आवडेल.  

साहित्य:

● मॅगीची २ पॅकेट

● १/४ कप कांद्याचे तुकडे

● १/४ कप टोमॅटोचे तुकडे

● १/४ कप सिमला मिरचीचे तुकडे

● १/४ कप हिरवे वाटाणे

● १/४ कप गाजरचे तुकडे

● १/२ टीस्पून गरम मसाला

● १ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर

● ३ सुक्या लाल मिरच्या

● १ टीस्पून लसूणचे तुकडे

● १ टीस्पून बटर

कृती

पंजाबी तडका मॅगी बनवण्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, वाटाणे आणि गाजर घाला. या भाज्या चांगल्या मऊ होईपर्यंत शिजवा. आता मॅगी मसाला, गरम मसाला, थोडे मीठ घालून मिक्स करा. मसाला शिजल्यावर त्यात २ वाट्या पाणी घाला. मसाला आणि पाणी एकत्र उकळून त्यात मॅगी नूडल्स घाला.झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्या. मॅगी जवळजवळ शिजली की दुसरे पॅन गरम करा आणि त्यात बटर घाला.बटर विरघळल्यावर त्यामध्ये चिरलेला लसूण आणि सुक्या लाल मिरच्या घाला. मिरच्या चांगल्या तडतडल्या की, त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर टाका. सर्वकाही नीट मिक्स झाल्यावर गॅस बंद करा. तुमची गरम पंजाबी तडका मॅगी गरम गरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT