Food Recipe esakal
फूड

Food Recipe : उपवासाचे तेच पदार्थ खाण्याची इच्छा नाहीये? एकादशी निमित्त बनवा खमंग भगरीचे धिरडे

आज प्रबोधिनी एकादशी सुरू

सकाळ डिजिटल टीम

Food Recipe : प्रबोधिनी एकादशी सुरू झाली आहे; पुराणानुसार आज भगवान विष्णू आपल्या चार महिन्याच्या दीर्घ निद्रेतून उठतील; आज सगळीकडे सर्वांनी उपवास धरला असेल. उपवास म्हटला की पहिली गोष्ट सुचते की साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा आणि तर भगर आमटी; पण हे तेच तेच पदार्थ खाण्याची इच्छा नाहीये? मग या उपवसाला बनवा झटपटीत खमंग भगरीचे धिरडे.

साहित्य:

१ वाटी साफ केलेली भगर

पाव वाटी साबुदाणा

२ बटाटे

अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे

५ ते ६ हिरव्या मिरच्या

कोथिंबीर

चवीनुसार मीठ

कृती

- सर्वात आधी १ वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा एका भांड्यात घेऊन २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

- हे अर्ध्या तासासाठी थोडंसं पाणी टाकून भिजायला झाकून ठेवा.

- यानंतर बटाटे उकडून घ्या आणि सोलून चांगले ठेसून घ्या.

- भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट करून घ्या.

- मिक्सर मध्ये हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर व्यवस्थित वाटून पेस्ट करून घ्या.

- अर्ध्या तासानंतर भिजलेली भगर, साबुदाणा मिक्सर मध्ये डोस्यासाठी लागत तसं बारीक पीठ करून घ्या. हे एका भांड्यात काढून घ्या.

- या भांड्यात आता कुट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट टाका, ठेसलेले बटाटे टाका आणि चवीनुसार मीठ टाकून पीठ छान फेटून घ्या.

- गरजेप्रमाणे थोड थोड पाणी टाकून बॅटर व्यवस्थित करून घ्या. बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावे.

- गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवा. तव्यावर साजूक तूप किंवा तेल टाकून तव्यावर पसरवून घ्या. तवा तापल्यानंतरच त्यावरती धिरडे तयार करायला घ्या. तेल किंवा तूप लावल्याने धिरडे तव्याला चिटकणार नाही त्याचबरोबर छान कुरकुरीत आणि टेस्टी लागतात .

- बारीक मऊसुद धिरडे करून दोघी बाजूने छान भाजून घ्या.

- गरमागरम भगरीचे धिरडे शेंगदाण्याच्या किंवा ओल्या नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT