rice sakal
फूड

भाताचाच पडला विसर

कोणताही सण असला तरी आम्ही दोघी एकत्रच स्वयंपाक करतो

तेजस भागवत

जुनी गोष्ट. मी व जाऊ अशी आमची दोन विभक्त कुटुंबे असली, तरी सण एकत्र साजरे करायचो. सर्व मिळून सात जण होतो. कोणत्याही सणाला सर्व स्वयंपाक जाऊ वंदना व मी मिळून करणार. पुरणपोळीचा स्वयंपाक असेल, तर पुरणपोळ्या मात्र वंदना लाटणार, हा शिरस्ता! ती एकीकडे गरमागरम पोळ्या लाटायची आणि मी सर्वांना जेवायला वाढायचे.

एकदा दसऱ्याला नेहमीप्रमाणे पुरणपोळीचा स्वयंपाक होता. नवरात्रीचे उपवास असल्याने लवकरच स्वयंपाकाला लागलो. वंदना पूजा व इतर आवराआवरी करत होती. बाराच्या आसपास स्वयंपाक- वरण, भजी, पापड, मेथी, बटाटा, भाजी, आमटी सर्व झाले. फक्त जेवताना गरमागरम पोळ्या लाटायच्या एवढेच बाकी होते. दोघीही मस्तपैकी वर्तमानपत्र वाचत बसलो.

दीड वाजता नैवेद्य भरण्यासाठी सुरू केले. तेव्हा लक्षात आले. अर्रर्रर्रर्र... भात लावायला ‘मी’ विसरले होते. मग काय? कुकर नावाचा हेल्पिंग हँड मदतीला धावला. सर्व पदार्थ बाहेरील खोलीत नेईपर्यंत भात झाला. आम्ही दोघींनी हुश्श्श केले. ‘‘अरे, आज भात अगदी गरमागरम, मस्त वाटतोय,’’ सगळे म्हणत होते. आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून हळूच हसत होतो. कारण गरम भाताचे टॉप सिक्रेट आम्हा दोघींनाच माहीत होते.

दुसऱ्या प्रसंगात बहिणीला जेवायला बोलावले होते. वंदना शाळेत गेलेली. म्हटले आपण करूयात पुरणपोळ्या! पण... कसचं काय? मला पोळ्या लाटायलाच जमेनात. नेहमी वंदना पोळ्या करत असल्याने मी कधीच पोळ्या लाटल्या नव्हत्या. शेवटी जेवायला आलेल्या बहिणीनेच पोळ्या लाटल्या व सर्वजण जेवलो. अर्थात, या प्रसंगानंतर मी पुरणपोळी लाटायला शिकले बरं का!

स्मिता वाळुंज, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

Marathi News Live Updates : गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात पोलिसांची कारवाई; डीजेचे साहित्य जप्त

कच्चं तेल १०८ डॉलरवर, सोमवारी ३.३ टक्क्यांची वाढ; कोणत्याही क्षणी पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार?

Ganeshotsav : वैद्यकीय साहित्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; आरोग्यसेवा व पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT