Garlic Bread Sticks Recipe esakal
फूड

Garlic Bread Sticks Recipe : काहीतरी मजेशीर खावस वाटत आहे? मग ट्राय करा, गार्लिक ब्रेड स्टिक्स

गदी झटपट बनणारी रेसिपी म्हणजे गार्लिक ब्रेड स्टिक्स

सकाळ डिजिटल टीम

Garlic Bread Sticks Recipe : रविवार म्हटला की काही नाही खावस वाटत असतं; त्यात साजरे संगीत स्वयंपाक करण्याची इच्छा नसतेच आणि भाजी पोळी तर नकोच असते अशात नक्की काय करावं हा प्रश्न असतोच. अशीच एक अगदी झटपट बनणारी रेसिपी म्हणजे गार्लिक ब्रेड स्टिक्स. रविवार म्हटल की काहीतरी नवीन खायचं असतं; त्यात एक नंबर वर असत पिझा आणि गार्लिक ब्रेड स्टिक्स. पण या ब्रेड स्टीक्स तुम्ही घरीही बनवू शकतात ते फक्त 5 मिनिटांत.

साहित्य

ब्राउन ब्रेड - 4-5 ( उभे कापून तुकडे केलेले)

बारीक ठेचून घेतलेले लसूण - 1 टीस्पून 

चिली फ्लेक्स - 1/2-1 टीस्पून  

ओरेगॅनो - 1 टीस्पून 

तेल - 2 टेबलस्पून 

मीठ एक छोटीसी चिमूटभर

किसलेले चीज - इच्छेनुसार

कृती:

- मायक्रोवेव्ह ओव्हन 200 डिग्री सेल्सिअस ला गरम करून घ्या. ब्रेड चे उभे तुकडे करून घ्या.

- एका छोट्या वाडग्यात तेल घेऊन त्यात जाडसर ठेचलेला लसूण, ओरेगॅनो, मीठ घेऊन एकत्र करा.

- छान मिक्स करून थोडावेळ झाकून बाजूला ठेवा. जास्त मीठ वापरू नका. ब्रेडमध्ये आणि चीज मध्ये आधीच थोडे मीठ असत.

- एका बेकिंग ट्रे मध्ये ब्रेड चे तुकडे ठेवून त्याला आधी बटर किंवा तेल लावा; त्यावर आता लसणाच मिश्रण लावा.

- मायक्रो प्री हिट झाला असेल, आता 4-5 मिनिटांसाठी किंवा टॉप कुरकुरीत ब्राउन होई पर्यंत बेक करा.

- बाहेर काढून चीज किसून नीट पसरवून परत ओव्हन मध्ये 1-2 मिनिटांसाठी बेक करा.

- क्रीम चीज डीप किंवा टोमॅटो केचअप बरोबर सर्व्ह करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT