Gauri Ganapati 2024 esakal
फूड

Gauri Ganapati 2024 : पुरणाच्या पोळ्यांना लागतो जास्त वेळ, मग गौराईसाठी बनवा खुसखुशीत सांज्याच्या पोळ्या 

Suji sweet recipe suji poli for gauri naivedya : सर्व गोष्टी इंस्टंट बनवणाऱ्या गृहिणींना पोळ्या बनवणं तसं वेळखाऊ काम वाटतं. त्यामुळेच, गौराईसाठी सांज्याच्या पोळ्या बनवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Gauri Avahan And Pujan:

तीन दिवसांपूर्वी गणेशाचे अन् आज वाजत-गाजत गौराईचे आगमन झाले आहे. गौराई सोन्याच्या पावली आपल्या घरी येतात. त्या सुख समाधान देऊन जातात. गृहिणींना सौभाग्याचा आशिर्वा देऊन जातात. त्यामुळेच गौराईसाठी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

गौराईसाठी उद्या म्हणजे गौरी पूजनादिवशी पूरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पण पुराणाच्या पोळ्या बनवण्यासाठी वेळ लागतो. सध्या सर्व गोष्टी इंस्टंट बनवणाऱ्या गृहिणींना पोळ्या बनवणं तसं वेळखाऊ काम वाटतं. त्यामुळेच, गौराईसाठी सांज्याच्या पोळ्या बनवू शकता. (Gauri Ganapati 2024)

साहित्य-

१ वाटीभर जाड रखा, १ वाटी गूळ, अर्धी वाटी साखर, २ वाट्या पाणी, ७,८ वेलदोड्यांची पूड, अर्धी वाटी रिफाईंड तेल, २ वाट्या कणीक, अर्धी वाटी मैदा, चिमूटभर मीठ, पाव वाटी तेल, तांदळाची पिठी.

कृती :

जाड रवा रिफाईंड तेलात खमंग भाजून घ्यावा. २ वाट्या पाणी, एक वाटी गूळ व अर्धी वाटी साखर घालून उकळून घ्यावे.

भाजलेल्या रव्यावर गूळ साखरेचे पाणी घालून ढवळावे व मंद आचेवर दोन वाफा घेऊन सांजा शिजवून घ्यावा. त्यात वेलदोड्याची पूड घालून गार करायला ठेवावा.

कणीक व मैदा चाळायच्या चाळणीने चाळून चिमूटभर मीठ घालून पाव वाटी तेलातले अर्धे तेल घालून भिजवावी.

२ तास कणीक भिजल्यावर पाणी व तेलाचा वापर करून सैलसर तिंबावी (पुरणपोळीच्या कणकेप्रमाणे)

कणकेचा लिंबाएवढा गोळा पिठीच्या साहाय्याने हातावर पसरून त्यात कणकेच्या दुप्पट सांजा हळूहळू भरून उंड्याचे तोंड बंद करावे.

पोळपाटावर तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने पोळी लाटावी व सपाट तव्यावर दोन्ही बाजूंनी गुलाबी भाजावी. अशा रीतीने सर्व पोळ्या कराव्यात.

महत्त्वाची टीप :

 रवा शक्यतो गव्हाच्या रंगाचा घ्यावा. नेहमीचा पांढरट रवा घेऊ नये. सांजा करताना रवा खरपूस भाजावा. रवा भाजताना थोड्या कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.

कणीक सैल नसेल तर पोळ्या चिवट होतात. रवा रिफाईंड तेलात भाजावा. वनस्पती तूपात भाजला तर थंड झाल्यावर तूप थिजून सांजा घट्ट होतो व पोळी नीट लाटली न जाता काठ राहतात.

सांजा कोरडा वाटला तर दूधाचा हात लावून मऊसूत करून घ्यावा. वरील साहित्यात ८ ते १० मध्यम आकाराच्या पोळ्या होतात. या पोळ्या ४ माणसांना पुरतात.

( संबंधित रेसिपी सौ.जयश्री देशपांडे यांच्या हमखास पाककृती या पुस्तकातून घेण्यात आली आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT