food esakal
फूड

सरकारचा मोठा निर्णय! पॅकेट पाहून समजेल तुमचं खाणं किती Healthy

पॅकबंद अन्नाच्या गुणवत्तेबाबत सामान्य माणसालाच नव्हे, तर सरकारलाही चिंता आहे.

सकाळ डिजिटल टीम

पॅकबंद अन्नाच्या गुणवत्तेबाबत सामान्य माणसालाच नव्हे, तर सरकारलाही चिंता आहे. यासाठी पॅकबंद वस्तूंसाठी हेल्थ स्टार रेटिंग लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

खरेदी केलेले उत्पादन आरोग्यासाठी (Health) किती हानिकारक आहे हे ग्राहकाला कळावे, यासाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) सर्व पॅकेज उत्पादनांचे हेल्थ रेटिंग करेल. FSSAIच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हेल्थ स्टार रेटिंग (HSR)चे उद्दीष्ट ग्राहकांना निरोगी अन्न खाण्याकडे आणणे हे आहे, जेणेकरून बिघडलेल्या लाइफस्टाइलमुळे भारतीयांना आजारी पडण्यापासून वाचवले जाऊ शकेल.

या मानकांवर रेटिंग निश्चित केले जाणार आहे

FSSAIच्या अधिकाऱ्याने सांगितले की, उत्पादनांमध्ये असलेल्या मीठ, साखर आणि चरबीचे प्रमाण यावर आधारित उत्पादनांचे आरोग्य रेटिंग निश्चित केले जाईल. ही माहिती पॅकेटच्या पहिल्या पानावरच दिली जाईल. 'आयआयएम अहमदाबाद'च्या संशोधन अहवालात पॅकेटच्या पहिल्या पानावर माहिती दिल्यास ग्राहकांवर अधिक परिणाम होईल, असे म्हटल्यानंतर ही तयारी करण्यात आली आहे.

20 हजार लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला

'FSSAI'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी सांगितले की, आयआयएम अहमदाबादने देशभरातील सुमारे २० हजार लोकांसह याचे सर्वेक्षण केले आणि समाजाला निरोगी खाण्याकडे कसे वळवता येईल, याचा शोध घेतला. या बदलाच्या माध्यमातून डायबिटीज, बीपी आदी असंसर्गजन्य आजारांना (NCD) आळा बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आता पॅकेटच्या मागे माहिती

उत्पादनांमध्ये असलेल्या पोषक तत्वांची (nutrient) माहिती देण्याची सूचना FSSAIने यापूर्वीच केली आहे, परंतु कंपन्या आता पॅकेटच्या मागील बाजूस देतात. आयआयएम अहमदाबादने (IIM-A) पहिल्या पानावर माहिती दिल्यास त्याचा अधिक परिणाम होईल, असे सुचविले. ब्रिटन, चिली, मेक्सिको, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये हा निकष पाळला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT