Gudi Padwa 2024  esakal
फूड

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला घरच्या घरी बनवलेल्या श्रीखंडाचा घ्या आस्वाद, एकदम सोपी आहे रेसिपी

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गोडाधोडाच्या पदार्थांची मेजवानी पहायला मिळते.

Monika Lonkar –Kumbhar

Gudi Padwa 2024 : महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू नववर्षाची सुरूवात या गुढीपाडव्याच्या सणाने होते. त्यामुळे, या सणाला विशेष असे महत्व आहे. सध्या महाराष्ट्रात सगळीकडे या सणाची मोठी धामधूम पहायला मिळत आहे. यंदा गुढीपाडव्याचा सण ९ एप्रिलला (मंगळवारी) साजरा केला जाणार आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी दारासमोर गुढी उभारली जाते. गुढीसमोर रांगोळी काढली जाते आणि गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. काही घरांमध्ये पुरणपोळीचा बेत असतो तर काही घरांमध्ये श्रीखंड-पुरीवर ताव मारला जातो.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरोघरी गोडाधोडाच्या पदार्थांची नुसती मेजवानी पहायला मिळते. उद्या गुढीपाडव्याचा सण आहे. त्यानिमित्ताने जर तुम्ही देखील घरच्या घरी श्रीखंड बनवण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला त्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे श्रीखंड कसे बनवायचे? चला तर मग जाणून घेऊयात त्याची सोपी रेसिपी.

श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • दीड कप दही

  • १ चमचा वेलची पावडर

  • २ चमचे किसलेले जायफळ

  • अर्धा कप साखर

  • १ चमचा गरम दूध

  • चिमूटभर केशर

  • २ चमचे काजू

  • २ चमचे बदाम

श्रीखंड बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • एका बाऊलमध्ये गरम दूध घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर केशर घाला.

  • आता हे मिश्रण एका बाजूला राहुद्या.

  • त्यानंतर, दुसऱ्या एका बाऊलमध्ये दही काढून घ्या आणि त्यामध्ये साखर घालून हे दह्याचे मिश्रण चांगले मिसळून घ्या.

  • त्यानंतर, या दह्याच्या मिश्रणात केशर घातलेले दूध मिसळून हे मिश्रण चांगले फेटून घ्या.

  • आता या मिश्रणात काजू आणि बदामचे बारीक तुकडे घाला.

  • त्यानंतर, हे तयार झालेले श्रीखंडाचे मिश्रण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून द्या.

  • आता तुमचे चविष्ट श्रीखंड खाण्यासाठी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT