Gudi Padwa 2024 esakal
फूड

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्यानिमित्त घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट बासुंदी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Gudi Padwa 2024 : अवघ्या २ दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सगळीकडे गुढीपाडव्याची धामधूम पहायला मिळत आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Gudi Padwa 2024 : अवघ्या २ दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सगळीकडे गुढीपाडव्याची धामधूम पहायला मिळत आहे. गुढीसाठी लागणारे साहित्य, साखरेच्या गाठी, रेशमी कापड इत्यादी गोष्टींमुळे बाजारपेठा सजल्या आहेत. गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो.

यंदा हा गुढीपाडवा ९ एप्रिलला (मंगळवारी) साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य बनवला जातो. या दिवशी खास गोड पदार्थ बनवले जातात. श्रीखंड पुरी, खीर आणि बासुंदीचा देखील बेत आखला जातो. या गुढीपाडव्याला जर तुम्ही देखील बासुंदी बनवण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. आज आम्ही तुम्हाला बासुंदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

बासुंदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • दूध - १ लिटर

  • साखर – १ वाटीभर

  • वेलची पावडर - ¼ चमचा

  • बदाम, पिस्ता, केशर सजावटीसाठी

बासुंदी बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • घरच्या घरी स्वादिष्ट बासुंदी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एका खोलगट पातेल्यात किंवा खोलगट पॅनमध्ये दूध टाका.

  • आता हे दूध चांगले उकळू द्या.

  • जोपर्यंत हे दूध निम्मे होत नाही. तोपर्यंत, हे दूध चमच्याच्या मदतीने ढवळत राहा.

  • दूध निम्मे आटल्यानंतर, त्यामध्ये वेलची पावडर आणि साखर घालून मध्यम आचेवर १० मिनिटे शिजू द्या.

  • हे मिश्रण चांगले शिजल्यानंतर एका भांड्यात बासुंदी काढून घ्या.

  • तुमची गरमागरम बासुंदी तयार आहे.

  • या बासुंदीमध्ये आता बदाम आणि पिस्त्याचे काप घालून ती सजवा.

  • केशरच्या मदतीने ही तुम्ही बासुंदी सजवू शकता.

  • बासुंदी थंड झाल्यावर खायला द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT