Halwa Recipe esakal
फूड

Halwa Recipe : रव्याच्या शिऱ्यापेक्षाही टेस्टी शिरा फक्त 15 मिनिटांत बनवा, नोट करा रेसिपी

हा शिरा अगदी १५ मिनिटांत तयार होतो. तेव्हा जाणून घेऊया पेठ्याच्या शिऱ्याची रेसिपी.

सकाळ डिजिटल टीम

Halwa Recipe : रव्याच्या शिरा म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची आवडती डिश. आईने घरी शिरा बनवला की लगेच मुलांना कळतं. प्रत्येकाच्या आवडीचा टेस्टी असा हा पदार्थ आहे. मात्र रव्याच्या शिऱ्यापेक्षाही टेस्टी लागतो पेठ्याचा शिरा.आणि हा शिरा अगदी १५ मिनिटांत तयार होतो. तेव्हा जाणून घेऊया पेठ्याच्या शिऱ्याची रेसिपी.

साहित्य

1/2 किलो पेठा, पांढरा भोपळा

भाजणीसाठी

1/4 कप तूप

Halwa recipe

हा पदार्थ बनवण्यासाठी

1 कप साखर

1 मोठा चमचा मनुके

1 मूठ काजू

गरजेनुसार कुटलेली बारीक काळी विलायची

3 लहान चमचे दूध

1 चिमूट केशर

बनवण्याची पद्धत

स्टेप १

सगळ्या आधी दूधात थोडी केशर टाका. आता केशरी चांगल्या प्रकारे भिजू द्या. त्यामुळे शिऱ्याची टेस्ट आणि रंग दोन्ही अगदी स्वादिष्ट दिसेल.

स्टेप २

त्यानंतर पेठ्यांना चांगल्या प्रकारे धुवून त्याचे साल काढून घ्या. आता लहान लहान तुकड्यांमध्ये कापून त्याला किसून घ्या.

स्टेप ३

आता एक पॅन घ्या, त्यात किसलेला पेठा टाका. इथे गॅसवर मध्यम आचेवर तेव्हापर्यंत शिजवा जेव्हापर्यंत त्यातील संपूर्ण पाणी त्यातून निघून जात नाही. पेठ्यातील पाणी पूर्णपणे सुखण्यासाठी 4-5 मिनिटांचा कालावधी लागतो. त्यानंतर पॅनमध्ये साखर टाका आणि त्याला चांगल्याप्रकारे शिजवून घ्या. (food)

स्टेप ४

जेव्हा साखर पूर्णपणे मिसळून जाईल तेव्हा दूध आणि केशरचे मिश्रण त्यात घाला. आणि थोड्या वेळ शिजवा.

स्टेप ५

आता दुसऱ्या पॅनमध्ये 4-5 चमचे तूप टाका, आता त्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्या. जेव्हा तूप पूर्णपणे गरम होईल तेव्हा त्यात काजू आणि मनुके टाका. आणि आता दोन मिनिटांपर्यंत फ्राय करा. आता सगळ्यात शेवटी विलायचीचं पावडर त्यात घाला. सगळ्या गोष्टी एकत्र मिसळून घ्या. तुमचा शिरा बनून तयार आहे. तुम्ही याला वरून ड्राय फ्रूटसह गार्निशही करू शकता. (recipe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT