Hansika Motwani Sakal
फूड

ग्लॅम-फूड : ‘समतोल आहाराला प्राधान्य’

हंसिका मोटवानी तिच्या खाण्याच्या सवयींबाबबत खूपच चौकस आहे. समतोल आहार आणि योग्य व्यायाम हेच तिच्या फिटनेसचे रहस्य आहे.

सकाळ वृत्तसेवा

- हंसिका मोटवानी

हंसिका मोटवानी तिच्या खाण्याच्या सवयींबाबबत खूपच चौकस आहे. समतोल आहार आणि योग्य व्यायाम हेच तिच्या फिटनेसचे रहस्य आहे. तिला भारतीय पद्धतीचे खाद्यपदार्थ आवडतात. याशिवाय हंसिका मेक्सिकन फूडचीही चाहती आहे. नॉर्थ इंडियन आणि साउथ इंडियन पद्धतीने बनवलेल्या खाद्यपदार्थांवर तिचे विशेष प्रेम आहे. ‘इडली सांबार’ हा पदार्थच तिच्यासाठी सर्वस्व असल्याचं ती सांगते. याबाबत एक गमतीदार किस्सा तिने सांगितला आहे. शालेय जीवनात आणि महाविद्यालयीन जीवनातही तिला तिचे मित्र-मैत्रिणी अजूनही ‘इडली वाली’ या नावाने चिडवायचे. हंसिका सगळेच पदार्थ आवडीने खाते; परंतु ती फिट राहण्यासाठी अतिशय काटेकोर डाएट प्लॅन फॉलो करायला प्राधान्य देते. कमीत कमी तेलात बनलेले पदार्थ खाण्याकडे तिचा कल असतो.

हंसिका दिवसाची सुरुवात दोन ग्लास पाणी पिऊन करते. त्यानंतर एक कप ग्रीन टी पिते. नाश्त्याला मल्टिग्रेन टोस्ट, एग व्हाइट्स किंवा पपई खाते.

दुपारच्या जेवणात रोटी, दाल, दलिया, सॅलड आणि दही या पदार्थांचा प्रामुख्याने समावेश असतो. रात्रीचे जेवण ती संध्याकाळी सहाच्या आधी करते. त्यात उकडलेल्या भाज्या आणि सॅलड यांचा समावेश असतो. स्नॅक म्हणून कुठलेही फळ किंवा ग्रीन टी आणि बिस्किटे खाते. रविवारचा दिवस ‘चीट मिल’साठी असतो; मात्र तरीही काही खाताना त्याचा अतिरेक होणार नाही याची ती काळजी घेते. कोल्ड ड्रिंकऐवजी फ्रूट ज्यूस पिण्यावर तिचा भर असतो. ‘स्ट्रॉबेरी’ हे तिचे सगळ्यांत आवडते फळ आहे. वर्कआउटनंतर प्रोटिन मिल्कशेक प्यायला तिला आवडते. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे ती टाळते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिते. घरगुती पद्धतीने बनवलेले राजमा चावल ही तिची फेव्हरेट डिश आहे.

हंसिकाला गोड पदार्थ खायला फारसे आवडत नाही; पण त्यातला त्यात कँडीज खायला तिला आवडते. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा स्वयंपाक करायला तिला आवडते. त्यातही प्रयोग करण्याकडे तिचा कल असतो. ‘हंसिका मोटवानी’ नावाने तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनल आहे. त्यावर तिने ‘पनीर माखनवाला’ ही डिश तिने स्वतः बनवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT