Have you eaten these three types of pasta Nagpur news 
फूड

तुम्ही पास्ताचे हे तीन प्रकार खाल्ले का? नाही तर आजच करा ट्राय

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आजच्या धावपळीच्या युगात सुखाने बसून दोन घास खाण्याचा अनेकांकडे वेळ नाही. यामुळे फास्टफूड खाणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. नूडल्स, वडापाव, पास्ता यासारख्या चायनिज पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जात आहे. तसेच हे पदार्थ घरीही तयार करता येत असल्याने अधिकच आकर्षण वाढले आहे. अनेकांच्या घरात तर पास्ता हमखास असतो. चला तर आज आपण जाणून घेऊन शिल्लक राहिलेल्या पास्तापासून कोणकोणते पदार्थ तयार करता येऊ शकते.

पास्ता मुलांच्या आवडत्या पदार्थांपैकी एक आहे. बऱ्याचदा पास्ता जास्त प्रमाणात शिजवतो. मात्र, मुलं ते खात नाही. यामुळे तो दुसऱ्यदिवशीसाठी तसाच ठेवला जाते किंवा फेकला जातो. यामुळे अन्नाची नासाडी होते. भारतीय संस्कृतीत अन्न फेकले जात नाही. अन्नाचा मान केला जातो. तेव्हा आपण उरलेल्या पास्तापासून बनवता येणाऱ्या तीन चवदार स्नॅक्सची रेसिपी सांगणार आहोत. हे स्नॅक तयार कराला फार वेळही लागत नाही. काही मिनिटांत हे स्नॅक तयार करू शकता आणि पास्ताची चव नव्या पद्धतीने घेऊ शकता. चला तर जाणून घेऊ या...

पास्ता सँडविचसाठी लागणारे साहित्य

एक पॅकेट ब्रेड, पन्नास ग्रॅम लोणी, उरलेला पास्ता, एक शिमला मिर्च, एक कांदा, एक चमचा तेल, गरजेनुसार टोमॅटो सॉस, अर्धा कप चीज, दोन चम्मच अंड्यातील बलक, एक चमचा क्रिम व मीठ.

बनविण्याची पद्धत

सर्वांत अगोदर ब्रेडला लोणीने लावून शेकून घ्या. यानंतर शिमला मिरची आणि कांद्याला कापून घ्या. आता ब्रेडच्या दोन तुकड्यांमध्ये उरलेला पास्ता, शिमला मिरची आणि कांदा टाका. दुसऱ्या साइसमध्ये अंड्यातील बलक आणि सॉस पसरवा आणि मागील स्लाइसच्या जागी सेट करा. सँडविचचे त्रिकोणी तुकडे करा आणि सॉससह आनंद घ्या.

पास्ता कटलेटसाठी लागणारी सामग्री

एक वाटी उरलेला पास्ता, तीन उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, अर्धा कप चिरलेली ताजी कोथिंबीर, मीठ, दोन चमचा मिरपूड पावडर, एक चमचा गरम मसाला, एक चमचा चाट मसाला, चार चमचे ब्रेडक्रंब, तीन मोठे चमचे कॉर्न फ्लोअर व तेल.

बनविण्याची पद्धत

वरील सर्व साहित्य मिसळून पेस्ट तयार करा. मिसळल्यानंतर याचे गोळे तयार करा आणि टिक्की किंवा कटलेटचा आकार द्या. आता कटलेटमध्ये कॉर्नफ्लोर घाला. तसेच आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ टाका. आता एका कढईत तेल गरम करा आणि तळून घ्या. तयार झालेले कटलेट चटणीसोबत खा.

पास्ता रोलची आवश्यक साहित्य

एक वाटी गव्हाचे पीठ, अर्धा चमचा हळद, मीठ, कांदा, दोन कॅप्सिकम, तेल, चार चमचे पास्ता मसाला, तीन वाटी उरलेला पास्ता व टोमॅटो सॉस.

बनविण्याची पद्धत

सर्वांत अगोदर कांदा आणि कॅप्सिकमचे लहान तुकडे करा. यानंतर कढईत तेल टाकून भाज्या घाला आणि थोडं मीठ टाकून शिजू द्या. भाज्यांचा पास्ता तयार झाल्यावर पास्ता मसाला आणि सॉस चांगला मिक्स करून घ्या. गव्हाच्या पिठामध्ये मीठ, हळद आणि दोन चमचे तेल घाला आणि मिसळून चौरस आकारात ब्रेड बनवा. उरलेला पास्ता आणि भाज्या मिक्स करा. आता याला रोल करून थोडं शिजवा आणि सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT