iced tea sakal
फूड

Lemon Iced Tea Recipe: वजन कमी करायचं आहे, मग ट्राय करा लेमन आइस्ड टी, जाणून घ्या रेसिपी

अनेक लोक डाएटसाठी सकाळी गरम पाणी आणि लिंबू पितात.

Aishwarya Musale

अनेक लोक डाएटसाठी सकाळी गरम पाणी आणि लिंबू पितात. याऐवजी ते हा लिंबाचा चहा म्हणजेच लेमन टी पिऊ शकतात. लेमन टीचे अनेक फायदे आहेत.

आपल्याला माहित आहेच की लेमन टी चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. पण कसा? लिंबू शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि मेटाबोलिजम वाढवण्यास मदत करते.

लिंबू हा विटामिन सीचा प्रमुख स्रोत आहे. यामुळे शरीरातील पेशींची वाढ आणि विकास होण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मदत होते. विटामिन सी लोहाची कमतरता रोखते आणि रक्तदाब व हृदयरोगाचा धोका कमी करते. दिवसभराच्या थकव्यानंतर संध्याकाळी एक कप लेमन आइस्ड टी प्यायल्याने सर्व थकवा तर दूर होतोच पण डिहायड्रेशनची समस्याही उद्भवत नाही.

लेमन आइस्ड टी रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि याचे सेवन नियमित केल्याने वजन वाढण्याची शक्यता कमी असते. चला तर मग जाणून घेऊया लेमन आईस्ड टीची रेसिपी.

साहित्य -

  • पाणी

  • चहापत्ती

  • चवीनुसार साखर

  • लिंबाचा रस

  • बर्फाचे तुकडे

प्रक्रिया -

  • प्रथम एका भांड्यात पाणी गरम करून उकळू द्या.

  • पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करून त्यात चहाची पाने टाका.

  • चवीनुसार साखर घालून मिक्स करा.

  • चहापत्ती ४ ते ५ मिनिटे उकळू द्या.

  • नंतर त्यात तीन चमचे लिंबाचा रस घाला.

  • चमच्याने चांगले मिसळा आणि नंतर चाळणीने गाळा.

  • त्यानंतर चहा थंड होऊ द्या आणि मग फ्रीजमध्ये ठेवा.

  • सर्व्ह करण्यापूर्वी, चहा एका ग्लासमध्ये घाला आणि त्यात बर्फाचे तुकडे घाला.

  • तुम्हाला हवे असल्यास वर लिंबाचे तुकडे घालून सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai High Court : पत्नी तुमच्या चाकरीसाठी नाही, जेवण न बनवणे, सफाई न करणे क्रूरता नाही; उच्च न्यायालयाने पतीला फटकारले

Pandharpur Town Project: वारकऱ्यांची खड्डे, चिखलातून होणार मुक्तता; महामार्ग प्राधिकरणाकडून ‘पंढरपूर टाउन’ प्रकल्पाला गती, नेमकं कस असेल रस्त्याचे स्वरूप?

‘एचएसआरपी’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कारवाई! वाहनांचे हस्तांतरण, कर्जाचा बोजा चढविणे, पुनर्नोंदणी, परवाना नुतनीकरण होणारच नाही, वाचा...

Satara Crime: जावळी तालुक्यात खळबळ! मजुरीच्या वादातून ५७ वर्षीय व्यक्तीची हत्या; आठ आरोपींना अटक

मोठी बातमी! महिलांच्या नावे घर खरेदीवेळी मुद्रांक शुल्कात १ टक्का सूट; बांधकाम व्यावसायिकांप्रमाणे राज्यात कोणत्याही जिल्ह्यात प्रॉपर्टीची खरेदी-विक्री

SCROLL FOR NEXT